​भन्साळींचा ‘खिल्जी’ रणवीर सिंगने चाहत्यांसाठी लिहिला १७१ शब्दांचा सुंदर संदेश! तुम्हीही वाचा!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2018 10:47 IST2018-01-25T05:17:59+5:302018-01-25T10:47:59+5:30

गत वर्षभरापासून वादात सापडलेला ‘पद्मावत’ हा चित्रपट आज रिलीज झाला. तथापि आजही या चित्रपटाविरोधात देशभर हिंसक निदर्शने सुरु आहेत. ...

Bhansali's 'Khilji' Ranveer Singh has written 171 beautiful words for fans! You also read !! | ​भन्साळींचा ‘खिल्जी’ रणवीर सिंगने चाहत्यांसाठी लिहिला १७१ शब्दांचा सुंदर संदेश! तुम्हीही वाचा!!

​भन्साळींचा ‘खिल्जी’ रणवीर सिंगने चाहत्यांसाठी लिहिला १७१ शब्दांचा सुंदर संदेश! तुम्हीही वाचा!!

वर्षभरापासून वादात सापडलेला ‘पद्मावत’ हा चित्रपट आज रिलीज झाला. तथापि आजही या चित्रपटाविरोधात देशभर हिंसक निदर्शने सुरु आहेत. याचदरम्यान ‘पद्मावत’मध्ये अल्लाऊद्दीन खिल्जीची भूमिका साकारणारा अभिनेता रणवीर सिंग याने प्रेक्षक आणि चित्रपटाच्या अख्ख्या टीमसाठी एक विशेष संदेश लिहिला आहे. ‘पद्मावत’ पाहिल्यानंतरच्या भावना रणवीरने या संदेशात व्यक्त केल्या आहेत.



 ‘काल रात्री मी ३ डी आयमॅक्समध्ये ‘पद्मावत’ पाहिला. चित्रपट पाहिल्यानंतर मी भारावून गेलोय. माझ्याजवळ शब्दचं नाहीत. मी स्व:ला नशीबवान समजतोय. अख्ख्या ‘पद्मावत’ टीमबद्दल मनात अभिमान दाटून आला आहे. या टीमला माझे खूप सारे प्रेम. माझ्या कामावर लोकांच्या प्रतिक्रिया ऐकून मी प्रचंड आनंदी आणि समाधानी आहे. प्रशंसेसाठी धन्यवाद. संजय सरांनी मला ही भूमिका देऊन मला एक अद्वितिय भेट दिली आहे. यासाठी मी त्यांना आभारी आहे. सर, आय लव्ह यू. आमच्या टीमची मेहनत पडद्यावर दिसतेय. आज माझ्या आवडत्या चित्रपटाच्या रिलीजच्या पूर्वसंध्येला मी तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देऊ इच्छितो. सोबतच तुम्हा सर्वांना माझा चित्रपट पाहण्यासाठी निमंत्रित करू इच्छितो. ज्या चित्रपटावर संपूर्ण देशाला गर्व वाटेल, अशा चित्रपटाचा मी एक भाग आहे, याचा अभिमान वाटतोय,’ असे  रणवीरने लिहिलेय. रणवीरच्या या मॅसेजवर लोकांनीही भरभरून प्रतिक्रिया  दिल्या आहेत. आम्हा सर्वांना तुझा अभिमान आहे, असे एका युजरने लिहिलेय. एकाने त्याला ‘किंग आॅफ बॉलिवूड’ संबोधले आहे.

ALSO READ : चार राज्यांत ‘पद्मावत’ नाहीच; BookmyShowला धमकी ! उर्वरित देशात ७००० स्क्रीन्सवर चित्रपट रिलीज!

दरम्यान ‘पद्मावत’विरोधात देशभर हिंसक निदर्शने सुरु आहेत. काल बुधवारी करणी सेनेने ठिकठिकाणी हिंसक प्रदर्शने केलीत. जमावाने दगड आणि काठ्यांनी बसच्या खिडकीच्या काचा फोडल्या. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हल्ला झाला तेव्हा बसमध्ये नर्सरी ते आठवी इयत्तेचे एकूण दहा विद्यार्थी  तसेच   एक शिक्षक, कंडक्टर आणि मदतनीसही होता. शिक्षक, मदतनीस आणि कंडक्टरच्या सतर्कतेमुळे या हल्ल्यातील विद्यार्थी कसेबसे बचावले. आज ‘पद्मावत’ च्या रिलीजच्या दिवशी करणी सेनेने भारत बंदचे आयोजन केले आहे.

Web Title: Bhansali's 'Khilji' Ranveer Singh has written 171 beautiful words for fans! You also read !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.