​भज्जीची पत्नी गीता बसरा दुस-यांदा बनणार आई!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2018 05:23 AM2018-01-14T05:23:42+5:302018-01-14T12:12:59+5:30

क्रिकेटपटू हरभजन सिंग यांची पत्नी व अभिनेत्री गीता बसरा पुन्हा एकदा आई होणार आहे. होय, स्वत: भज्जीने अलीकडे ही ...

Bhajji's wife Geeta Basra is coming to be a second time! | ​भज्जीची पत्नी गीता बसरा दुस-यांदा बनणार आई!

​भज्जीची पत्नी गीता बसरा दुस-यांदा बनणार आई!

googlenewsNext
रिकेटपटू हरभजन सिंग यांची पत्नी व अभिनेत्री गीता बसरा पुन्हा एकदा आई होणार आहे. होय, स्वत: भज्जीने अलीकडे ही माहिती दिली.
एका ताज्या मुलाखतीत भज्जीने ही गोड बातमी सर्वांसोबत शेअर केली. यंदाच्या लोहरीवर माझी मुलगी आणि माझी पत्नी इंग्लंडमध्ये आहेत. ख्रिसमस आणि न्यू ईयर आम्ही तिथेच साजरे केले. मला विराटच्या रिसेप्शनसाठी यायचे होते, म्हणून मी परत आलो. गीता व माझी मुलगी अजूनही इंग्लंडमध्येच आहेत. गतवर्षी आम्ही लोहरीअतिशय धूमधडाक्यात साजरी केली होती. कदाचित पुढच्या वर्षी  हिनायाचा(भज्जीची मुलगी) भाऊ वा बहिण झाल्यावरआम्ही आणखी अशाच धूमधडाक्यात लोहरी साजरी करू. मला मुले मनापासून आवडतात. मग स्वत:चे असोत किंवा इतरांचे, असे भज्जीने या मुलाखतीत सांगितले. आता इतकी गोड बातमी आपल्यासोबत शेअर केल्याबद्दल भज्जी व गीताचे अभिनंदन तर व्हायलाच हवे ना. तुम्ही खालील कमेंट बॉक्समधून भज्जी व गीताला शुभेच्छा देऊ शकता.
 गीताने २०१६ मध्ये लंडनमध्ये मुलीला हिनायाला जन्म दिला होता. भज्जीची आई अवतार कौरने ही बातमी मीडियाशी शेअर केली होती.
२०१५ मध्ये हरभजन आणि गीताने गेल्या वर्षी मोठ्या धुमधडाक्यात लग्न केले होते. सुमारे पाच वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला होता. एका गुरुद्वाºयात त्यांनी लग्न केले होते. त्यांच्या लग्नाच्या रिसेप्शनला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक दिग्गज नेतेमंडळी, क्रिकेटर्स व व्यवसायिकांनी हजेरी लावली होती.

ALSO READ : हरभजन सिंग-गीता बसराने केली मुलीसोबत पहिली लोहरी सेलिब्रेट

  गीताने ‘दिल दिया है’ (२००६) या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर ती ‘द ट्रेन’ आणि ‘सेकंड हसबंड’ या चित्रपटांतूनही दिसली होती.

Web Title: Bhajji's wife Geeta Basra is coming to be a second time!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.