"लोक मला शिव्या घालतात...", भाग्यश्रीच्या लेकाचं एकच दु:ख
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2022 16:06 IST2022-06-16T16:01:16+5:302022-06-16T16:06:56+5:30
Bhagyashree son and actor abhimanyu dassani : अभिमन्यू हा प्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्रीचा मुलगा आहे. बॉलीवूडमधील स्टार किड्स खूप चर्चेत असतात पण,

"लोक मला शिव्या घालतात...", भाग्यश्रीच्या लेकाचं एकच दु:ख
अभिनेत्री भाग्यश्री(Bhagyashree)चा मुलगा आणि बॉलिवूड अभिनेता अभिमन्यू दासानी(Abhimanyu Dassani) ‘निकम्मा’ या चित्रपटात दिसणार आहे. याआधी अभिमन्यू 2018 मध्ये मर्द को दर्द नही होता (Mard Ko Dard Nahi) या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटाद्वारे अभिमन्यूने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. सध्या तो 17 जून रोजी प्रदर्शित होणाऱ्या निकम्मा या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. अलीकडेच अभिमन्यूने स्टार किड्स असण्याचे तोटे सांगितले. त्याने सांगितले की, स्टार किड होण्याचे नुकसान स्वतःला भोगावे लागले आहे.
अभिमन्यू हा प्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्रीचा मुलगा आहे. बॉलीवूडमधील स्टार किड्स खूप चर्चेत असतात आणि त्यांना आधीच लोकप्रियता मिळते. अभिमन्यूच्या अभिनयाला आणि चित्रपटांना चाहत्यांचा आणि समीक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असेल पण स्टार किड म्हणून लोकांना तो आवडला नाही. नुकतेच अभिमन्यूने एका न्यूज पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, '. सकाळी उठल्यावर अनेक मेसेज येतात, ज्यात गलिच्छ शिव्या असतात. काही लोक म्हणतात की मी इथपर्यंत पोहोचण्याची लायकी नाही. हे आजही घडते आणि मला ते खरोखरच विचित्र वाटते म्हणून ज्यांना चित्रपटांबद्दल काहीच माहिती नाही त्यांच्यासमोर मला स्वतःला सिद्ध करावे लागेल.
अभिमन्यू पुढे सांगतो, 'मी वयाच्या १५व्या वर्षापासून कुटुंबीयांकडून पैसे न घेण्याचा निर्णय घेतला आणि करिअरवर लक्षकेंद्रीत केलं. अभिन्यु सेटवर जायचा कारण तिथे तो रमायचा. यादरम्यान त्याला त्याच्या करिअरमध्ये काय करायचे आहे हेही समजले. वयाच्या १५ व्या वर्षी त्याने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करायला सुरुवात केली. त्याने 'दम मारो दम' आणि 'नौटंकी साला' या चित्रपटांमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे.
दिग्दर्शक सब्बीर खान यांच्या निकम्मा या चित्रपटात अभिमन्यू दासानी शिल्पा शेट्टी आणि शर्ली सेटिया सोबत दिसणार आहे, जो शुक्रवार, 17 जून रोजी रिलीज होणार आहे.