​या कारणामुळे स्कोर ट्रेन्ड्सवर सलमान खान बनला नंबर वन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2018 11:02 IST2018-03-27T05:32:40+5:302018-03-27T11:02:40+5:30

स्कोर ट्रेंडर्स इंडियाच्या आकडेवारीनुसार, १५ ते २२ मार्चच्या आठवड्यात सुपरस्टार सलमान खान बॉलिवूडचा नंबर वन स्टार ठरला आणि सलमान ...

Because of this, Salman Khan became number one on the score trades! | ​या कारणामुळे स्कोर ट्रेन्ड्सवर सलमान खान बनला नंबर वन!

​या कारणामुळे स्कोर ट्रेन्ड्सवर सलमान खान बनला नंबर वन!

कोर ट्रेंडर्स इंडियाच्या आकडेवारीनुसार, १५ ते २२ मार्चच्या आठवड्यात सुपरस्टार सलमान खान बॉलिवूडचा नंबर वन स्टार ठरला आणि सलमान खानला नंबर वन बनवलं, त्याच्या बहूप्रतिक्षित रेस-3 या चित्रपटाने.
दबंग खानने नुकतेच, आपल्या रेस-3 चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले असून या सिनेमातल्या त्याच्या लूकचे टिझर पोस्टरही रिव्हिल झाले आहे. सध्या सलमान आपला टेलिव्हिजन शो दस का दममुळे देखील प्रकाशझोतात आहे. त्यामुळेच गेल्या आठवड्यात दबंग खानचा दबदबा होता. त्यामुळेच तर सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या सल्लुमियाँने ९०.९७ गुणांसह स्कोर ट्रेंड्सच्या चार्टवर प्रथम येण्याचा मान मिळवलाय.
तसेच सलमान ‘द दबंग टूर’च्या निमित्ताने पुण्यात देखील गेला होता आणि विशेष म्हणजे कॅटरिना कैफ आणि सोनाक्षी सिन्हा यांच्यासोबत तो एका पत्रकार परिषदेला देखील उपस्थित राहिला होता. या पत्रकार परिषदेतील त्याच्या आणि कॅटरिनाच्या केमिस्ट्रीची चांगलीच चर्चा रंगली होती. कारण या पत्रकार परिषदेच्या दरम्यान सलमान आणि कॅटरिना यांना एकाच कपमधून कॉफी पिताना पाहाण्यात आले होते. 
सलमानसोबतच, आंतरराष्ट्रीय अभिनेत्री प्रियंका चोप्रासुद्धा अभिनेत्रींच्या यादीत सर्वाधिक लोकप्रिय आहे. मायदेशी परतलेली बॉलिवूडची ही लाडकी अभिनेत्री आता कोणत्या बॉलिवूडपटाची घोषणा करतेय, याची सर्वांना प्रतिक्षा होती आणि त्यामुळेच सर्वाधिक चर्चेत राहून प्रियंकाने ६८.९७ गुणांसह लोकप्रियतेचे शिखर गाठलंय.
अमेरिकेच्या स्कोर ट्रेंड्स इंडिया या मीडिया-टेक कंपनीने लोकप्रियतेच्या निकषांवर आधारित ही लिस्ट दिली आहे. स्कोर ट्रेंड्सचे सह-संस्थापक अश्वनी कौल याविषयी सांगतात, “आम्ही १४ भारतीय भाषांमधल्या ६०० बातम्यांच्या स्रोताद्वारे हा डेटा एकत्र केला आहे. मीडियामध्ये उपलब्ध आकडेवारीनुसार हा डेटा आम्हाला मिळाला आहे.”
अश्वनी कौल पुढे सांगतात, "यामध्ये फेसबुक, ट्विटर, प्रिंट प्रकाशन, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या न्यूज, ब्रॉडकास्ट आणि डिजिटल प्लॅटफॉर्म यांचा समावेश आहे. विविध अत्याधुनिक एल्गोरिदम नंतर आम्हाला या प्रचंड प्रमाणातील डेटावर प्रक्रिया करण्यास मदत होते आणि बॉलिवूड स्टार्सच्या गुणसंख्या आणि क्रमवारीपर्यंत पोहचता येते."

Also Read : मीडियाच्या शेकडो कॅमे-यांसमोर एकाच कपातून कॉफी पितांना दिसले सलमान खान अन् कॅटरिना कैफ!

Web Title: Because of this, Salman Khan became number one on the score trades!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.