जेवण आवडले नसल्याने ‘या’ सेलिब्रिटीने मोलकरणीला केली जबर मारहाण; गुन्हा दाखल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2018 19:14 IST2018-06-17T13:44:07+5:302018-06-17T19:14:14+5:30

जेवण आवडले नसल्याने मिस एशिया पॅसिफिक राहिलेल्या टिना चटवालने मोलकरीण माया दासला जबर मारहाण केली. याप्रकरणी दोघींवरही परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Because of not liking food, this 'celebrity' has sued for the money; Filing a complaint! | जेवण आवडले नसल्याने ‘या’ सेलिब्रिटीने मोलकरणीला केली जबर मारहाण; गुन्हा दाखल!

जेवण आवडले नसल्याने ‘या’ सेलिब्रिटीने मोलकरणीला केली जबर मारहाण; गुन्हा दाखल!

स एशिया पॅसिफिक राहिलेली टिना चटवालला शुक्रवारी पोलिसांनी अटक केली आहे. तिच्यावर मोलकरीण माया दास हिला मारपीट करण्याचा आरोप आहे. मायाने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले की, ‘गुरुवारच्या सायंकाळचे जेवण टिनाला पसंत आले नसल्याने तिने मला मारपीट केली. टिना गुडगावच्या डीएलएफ वेस्ट अ‍ॅण्ड हायट्स सोसायटीमध्ये राहते. या हानामारीत दोघींही जखमी झाल्या आहेत. मोलकरीण मायाच्या मते, माझी आरडा-ओरड ऐकूण आजूबाजूच्या फ्लॅट्समध्ये काम करणाºया इतर मोलकरणी माझ्यासाठी धावून आल्या. त्यांच्या मदतीमुळेच माझी सुटका होऊ शकली. त्यांनी मला लगेचच रुग्णालयात दाखल केले. 

दरम्यान, याप्रकरणी सुरुवातीला पोलिसांची भूमिका काहीशी संदिग्ध होती. माया दासने दिलेल्या माहितीनुसार, तिने गुरुवारीच गुडगाव स्थित सेक्टर ५३ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. परंतु पोलिसांकडून कुठल्याही प्रकारची कारवाई केली गेली नाही. त्यानंतर तिने घरगुती कामगार युनियनकडे याबाबतची तक्रार दिली. शुक्रवारी युनियनने पोलिसांना घेराव घातला. त्यानंतर त्यांनी टिनाला तिच्या घरातून अटक केली. मात्र टिनाने मोलकरीणलाही याप्रकरणात अडकविले आहे. तिने सिव्हिल हॉस्पिटलच्या मेडिकल रिपोर्टचा हवाला देताना आरोप केले की, मोलकरणीनेच तिच्याशी मारपीट केली. ज्यानंतर पोलिसांनी मोलकरीण मायालाही अटक केली. पुढे दोघींनाही पोलीस उपायुक्तांकडे हजर केले गेले. त्यानंतर त्यांचा जामीन मंजूर करण्यात आला. 



रिपोर्ट्सनुसार, जेव्हा मायाने पोलिसांत तक्रार दिली, तेव्हा काही लोकांनी तिच्यावर दबाव टाकला की, तिने याप्रकरणी शांत रहावे. परंतु अशातही तिने माघार घेतली नाही. जेव्हा ही बाब इतर मोलकरणींना कळाली तेव्हा त्यांनी मायाची बाजू घेतली. यासर्व मोलकरणी टिनाच्या अटकेसाठी तब्बल १८ तास संघर्ष करीत राहिल्या. टिनाने २००२ मध्ये ‘मिस एशिया पॅसिफिक’चा किताब आपल्या नावे केला होता. 

Web Title: Because of not liking food, this 'celebrity' has sued for the money; Filing a complaint!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.