BE SAFE !! मुंबईच्या पावसाने चुकला बॉलिवूड सेलिब्रिटींच्या काळजाचा ठोका, मुंबईकरांसाठी दिसली चिंता!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2017 13:15 IST2017-08-30T06:40:00+5:302017-08-30T13:15:06+5:30

काल मंगळवारपासून अख्खी मुंबई तुंबलीय. मुसळधार पावसाने मुंबईकरांना वेठीस धरले आणि मुंबई जणू ठप्पच झाली. सकाळी कामासाठी बाहेर पडलेले ...

BE SAFE !! Mumbai's rains wrongly hit Bollywood celebrities, worried for Mumbaiites! | BE SAFE !! मुंबईच्या पावसाने चुकला बॉलिवूड सेलिब्रिटींच्या काळजाचा ठोका, मुंबईकरांसाठी दिसली चिंता!

BE SAFE !! मुंबईच्या पावसाने चुकला बॉलिवूड सेलिब्रिटींच्या काळजाचा ठोका, मुंबईकरांसाठी दिसली चिंता!

ल मंगळवारपासून अख्खी मुंबई तुंबलीय. मुसळधार पावसाने मुंबईकरांना वेठीस धरले आणि मुंबई जणू ठप्पच झाली. सकाळी कामासाठी बाहेर पडलेले हजारो मुंबईकर काल दुपारनंतर ठिकठिकाणी अडकून पडलेत. ‘२६ जुलै’च्या आठवणी ताज्या करणाऱ्या  कालच्या पावसाने अनेकांना धडकी भरवली. या अस्मानी संकंटात सामान्यांचे हजारो हात मुंबईकरांच्या मदतीला आले. अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘बी सेफ मुंबई’ची कामना केली. यात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींचाही समावेश होता. दीपिका पादुकोण, प्रियांका चोप्रा, अभिषेक बच्चन, श्रद्धा कपूर, आलिया भट्ट अशा अनेकांनी मुंबईकरांना काळजी घेण्याची आणि एकमेकांना मदत करण्याचे आवाहन केले.

सध्या भारतात मुक्कामाला असलेली प्रियांका चोप्रा हिने आपल्या ट्विटमध्ये बीएमसी, पोलिस अशा सगळ्यांचे हेल्पलाईन क्रमांक देत, मुंबईकरांना शक्यतोवर घरीच राहण्याचे आवाहन केले. प्लीज, घरापेक्षा सुरक्षित काही नाही. तेव्हा सुरक्षित राहा. मदत घ्या आणि मदत करा. बी सेफ मुंबई, असे ट्विट  तिने केले.

                                     

अभिनेता फरहान अख्तर यानेही हेल्पलाईन क्रमांक शेअर केलेत. सोशल मीडियावर  #MumbaiRains हॅशटॅग ट्रेंड करत असतानाच अभिनेत्री गुल पनाग हिने यावर टिष्ट्वट केले. ज्यानेही हा हॅशटॅग ट्रेंडमध्ये आणला, त्याला हे सांगायला हवे की,कुणीच मुंबईच्या पावसाला सेलिब्रेट करत नाहीत. याशिवाय गुलने चाहत्यांना काही महत्त्वाच्या सूचनाही केल्यात.  घराकडे परतत असाल तर सोबत किमान दिवसभरासाठीचे खायला आणि पाणी घेऊन बाहेर पडा. तिने एक फोटो शेअर करत मुंबईत मुसळभार पाऊस कोसळणार असल्याची माहिती अपडेट केली. याशिवाय आलिया भट्ट, परिणीती चोप्रा अशा अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी मुंबईकरांना सुरक्षित राहण्याची विनंती केली. दीपिका पादुकोण , अभिषेक बच्चन यांनीही मुंबईकरांना काळजी घेण्याचे आवाहन केले.

                                    

                                    

                                   
              
                                   

Web Title: BE SAFE !! Mumbai's rains wrongly hit Bollywood celebrities, worried for Mumbaiites!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.