B'day Special : अनिल कपूरकडे टॅक्सीचे भाडे देण्यासाठी पैसे नसायचे; पत्नी सुनीताच करायची सर्व खर्च!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2017 17:06 IST2017-12-24T11:36:25+5:302017-12-24T17:06:25+5:30

बॉलिवूडचा झक्कास अभिनेता अनिल कपूर आज त्याचा ६१ वा वाढदिवस साजरा करीत आहे. २४ डिसेंबर १९५६ रोजी जन्मलेल्या अनिलचा ...

B'day Special: Anil Kapoor did not have the money to pay taxis; All the expenses for wife Sunita! | B'day Special : अनिल कपूरकडे टॅक्सीचे भाडे देण्यासाठी पैसे नसायचे; पत्नी सुनीताच करायची सर्व खर्च!

B'day Special : अनिल कपूरकडे टॅक्सीचे भाडे देण्यासाठी पैसे नसायचे; पत्नी सुनीताच करायची सर्व खर्च!

लिवूडचा झक्कास अभिनेता अनिल कपूर आज त्याचा ६१ वा वाढदिवस साजरा करीत आहे. २४ डिसेंबर १९५६ रोजी जन्मलेल्या अनिलचा बॉलिवूडमधील प्रवास थक्क करणारा आहे. तसेच अनेक सुपरहिट चित्रपट देणाºया या अभिनेत्याची लव्हस्टोरीदेखील चांगलीच इंटरेस्टिंग आहे. जेव्हा अनिल बॉलिवूडमध्ये स्ट्रगल करीत होता, तेव्हा त्याची आर्थिक परिस्थिती खूपच हलाखीची होती. टॅक्सीचे भाडे देण्यासाठीदेखील त्याच्याकडे पैसे नसायचे. अशावेळी पत्नी सुनीता त्याचा सर्व खर्च करीत असे. अनिल आणि सुनीताची लव्हस्टोरी त्याकाळी चांगलीच बहरली होती. सुनीताचा आवाज ऐकण्यासाठी अनिल अक्षरश: आतुर असायचा. परंतु ही बाब फारच कमी लोकांना माहिती आहे की, मित्रांच्या सांगण्यावरून त्याने सुनीतासोबत दोनदा लग्न पोस्टपॉन्ड केले. पुढे दोघांनी १९ मे १९८४ रोजी लग्न केले. 

जेव्हा दोघांची पहिली भेट झाली होती, तेव्हा अनिल बॉलिवूडमध्ये स्ट्रगल करीत होता. त्यावेळी सुनीता एक प्रसिद्ध मॉडेल होती. अनिलने सुनीताला बघताच तो तिच्या प्रेमात पडला होता. अनिल सुनीताला रोज भेटू इच्छित होता, परंतु तिला रोज भेटायला टॅक्सीने जाण्यासाठी त्याच्याकडे पैसे नसायचे. अशात अनिलच्या मित्रांनी त्याला एक टेलिफोन नंबर प्रोव्हाइड केला. त्यानंतर दोघांमध्ये संवाद सुरू झाला. अनिलला सुनीताचा आवाज खूप आवडायचा. त्यामुळे सुनीताचा केव्हा फोन येतो, याची तो प्रतीक्षा करायचा. 



अनिलने एका मुलाखतीत याबाबतचा खुलासा करताना म्हटले होते की, सुनीतासोबत फोनवर बोलताना एक दिवस मी तिला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. तिनेही लगेचच होकार दिला. त्यावर सुनीताने म्हटले की, किती वेळात पोहचशील? तेव्हा मी म्हटले दोन तासात. सुनीताने म्हटले एवढा वेळ का? त्यावर मी म्हटले, मी बसने येणार आहे, त्यामुळे मला एवढा वेळ लागणार आहे. सुनीताने म्हटले बसने का? मग मीदेखील तिला स्पष्ट सांगितले की, माझ्याकडे टॅक्सीने येण्यासाठी पुरेसे पैसे नाहीत. तेव्हा सुनीताने म्हटले, तू टॅक्सीने ये मी त्याला पैसे देईल. 



या डेटनंतर दोघे बस आणि टॅक्सीने मुंबईतील चांगल्या ठिकाणांवर नेहमीच भेटू लागले. सुनीता एक प्रसिद्ध मॉडेल असतानाही बसमध्ये फिरण्यास ती कधीच नकार देत नव्हती. उलट ती अनिलचा सर्व खर्च करायची. अखेर अनिलने तिला प्रपोज केले, तेव्हा दोघांची ही लव्हस्टोरी लग्नापर्यंत पोहोचली. 

Web Title: B'day Special: Anil Kapoor did not have the money to pay taxis; All the expenses for wife Sunita!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.