B'day Special : कधीकाळी राज कपूर यांच्या गॅरेजमध्ये काम करायचा झक्कास अभिनेता अनिल कपूर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2017 16:36 IST2017-12-24T11:06:21+5:302017-12-24T16:36:21+5:30

२४ डिसेंबर १९५६ रोजी बॉलिवूड अभिनेता आणि निर्माता अनिल कपूर याचा मुंबईतील चेंबूर, टिळकनगर येथे जन्म झाला. निर्माता सुरिंदर ...

B'day Special: Actor Anil Kapoor has worked in Raj Kapoor's Garage. | B'day Special : कधीकाळी राज कपूर यांच्या गॅरेजमध्ये काम करायचा झक्कास अभिनेता अनिल कपूर!

B'day Special : कधीकाळी राज कपूर यांच्या गॅरेजमध्ये काम करायचा झक्कास अभिनेता अनिल कपूर!

डिसेंबर १९५६ रोजी बॉलिवूड अभिनेता आणि निर्माता अनिल कपूर याचा मुंबईतील चेंबूर, टिळकनगर येथे जन्म झाला. निर्माता सुरिंदर कपूर आणि निर्मल कपूर या दाम्पत्याच्या चार मुलांपैकी अनिल दुसºया क्रमांकाचा मुलगा आहे. अनिलचे मोठे भाऊ बोनी कपूर एक यशस्वी निर्माता असून, लहान भाऊ संजय कपूर अभिनेता म्हणून इंडस्ट्रीत सक्रिय आहे. अनिलने सेंट जेवियर कॉलेजमधून आपले शिक्षण पूर्ण केले. त्याने वयाच्या बाराव्या वर्षीच १९७१ मध्ये ‘तू पायल मैं गीत’ या चित्रपटात अभिनेता शशी कपूर यांच्या बालपणीची भूमिका साकारली होती. मात्र हा चित्रपट रिलीज होऊ शकला नाही. त्यानंतर अनिल कपूरने १९७९ मध्ये ‘हमारे तुम्हारे’ या चित्रपटात एक छोटीशी भूमिका साकारली. अनिलने बॉलिवूडमध्ये स्थिरावण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. त्याच्यावर एक काळ असाही आला होता, जेव्हा त्याची आर्थिक परिस्थिती ठीक नव्हती तेव्हा त्याने चक्क दिवंगत अभिनेते राज कपूर यांच्या गॅरेजमध्ये काम केले होते. 

मुख्य अभिनेता म्हणून अनिलच्या करिअरची सुरुवात खºया अर्थाने १९८० मध्ये आलेल्या ‘वम्स व्रूक्षम’ या तेलगू चित्रपटातून झाली. या चित्रपटाला बापू यांनी दिग्दर्शित केले होते. याच वर्षी अनिलचे ‘एक बार कहो’ आणि ‘हम पांच’ हे दोन चित्रपट रिलीज झाले. बॉलिवूडमध्ये ‘वो सात दिन’ हा अनिलचा पहिला मुख्य अभिनेता म्हणून चित्रपट होता. परंतु अनिलला ओळख मिळवून देण्याचे काम खºया अर्थाने यश चोपडा यांच्या ‘मशाल’ या चित्रपटाने केले. आज अनिलच्या ६१ वाढदिवसानिमित्त त्याच्या आयुष्याशी निगडित काही रंजक गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 



- अनिल कपूर बॉलिवूडबरोबर हॉलिवूडमध्येही ओळखीचा चेहरा आहे. २००८ मध्ये आलेल्या स्लमडॉग मिलेनियर या चित्रपटात अनिलने प्रमुख भूमिका साकारली होती. डॅनी बॉयल यांच्यासोबत अनिलचा हा पहिला आंतरराष्टÑीय प्रोजेक्ट होता. 

- अनिलने कॉस्ट्यू डिझायनर सुनीता भावनानी कपूर यांच्याशी विवाह केला. या दाम्पत्याला तीन मुले आहेत. सोनम, रिया आणि हर्षवर्धन कपूर अशी त्यांची नावे आहेत. 

- कधीकाळी अनिलची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने त्याने दिवगंत अभिनेते राज कपूर यांच्या गॅरेजमध्ये काम केले आहे. 

- अनिलला पुणे फिल्म इन्स्टिट्यूटने प्रवेश देण्यास त्याकाळी स्पष्ट शब्दात नकार दिला होता. 

- अभिनयाबरोबरच अनिल कपूर गायकदेखील आहे. त्याचे पहिले गाणे ‘चमेली की शादी’ या चित्रपटाचे टायटल ट्रॅक आहे. 

- अनिल कपूरला त्याचा पहिला फिल्मफेअर अवॉर्ड १९८८ साली मिळाला होता. 

- २००० या वर्षात रिलीज झालेल्या ‘पुकार’ या चित्रपटासाठी अनिल कपूरला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानितही करण्यात आले. 

Web Title: B'day Special: Actor Anil Kapoor has worked in Raj Kapoor's Garage.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.