​‘बाहुबली2’च्या एडिटींग रूमला छावणीचे रूप!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2017 14:15 IST2017-03-29T08:45:54+5:302017-03-29T14:15:54+5:30

‘बाहुबली2’बद्दलची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. पण आपल्याला आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. सध्या या सिनेमाचे फायनल एडीटिंग ...

'Bahubali2's Editing Room' as a campfire! | ​‘बाहुबली2’च्या एडिटींग रूमला छावणीचे रूप!

​‘बाहुबली2’च्या एडिटींग रूमला छावणीचे रूप!

ाहुबली2’बद्दलची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. पण आपल्याला आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. सध्या या सिनेमाचे फायनल एडीटिंग सुरू आहे. तेही कडेकोट बंदोबस्तात. होय, रिलीजपूर्वी चित्रपट लिक होण्याचा धोका बघता, ‘बाहुबली2’च्या एडिटींग रूमला सध्या छावणीचे रूप आले आहे. म्हणजे, याठिकाणी सीसी टीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत.  केवळ सात व्यक्तिंना याठिकाणी जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. सिनेमातल्या कलाकारालाही सहजासहजी एडिटींग रूममध्ये जाण्याची परवानगी नाही. त्यांना जायचे असेलच तर त्याचीही कसून  तपासणी केली जात आहे. 
गत काही वर्षांत सिनेमे लिक होण्याचे प्रमाण वाढले आहे. सिनेसृष्टीला पायरसीची किड लागली आहे. ‘बाहुबली2’चे दिग्दर्शक एस.एस. राजमौली त्यामुळे कमालीचे दक्ष आहेत. कुठल्याही स्थितीत चित्रपट लीक होता कामा नये, यासाठी राजमौली प्रयत्न करीत आहेत. ‘बाहुबली2’ येत्या २८ एप्रिलला रिलीज होतो आहे. खरे तर रिलीजपूर्वीच हा चित्रपट ब्लॉकबस्टर सिद्ध झाला आहे. गत १६ मार्चला या चित्रपटाचे ट्रेलर आले आणि कोट्यवधी लोक अक्षरश: त्यावर तुटून पडले. अगदी काही तासांत कोट्यवधी लोकांनी हा ट्रेलर बघितला. हा आत्तापर्यंतचा एक विक्रम मानला जात आहे. ‘बाहुबली2’चा ट्रेलर जगातील सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या व्हिडिओंच्या यादीत सातव्या क्रमांकावर आला आहे. याच्या आजुबाजुला कुठलाही भारतीय व्हिडिओ नाही, हे येथे विशेष.

ALSO READ : MUST WATCH: ​‘बाहुबली2’च्या भव्यदिव्य सेटची ही पाहा एक झलक!

‘बाहुबली2’ चार भाषांमध्ये भारतात ६५०० स्क्रिन्सवर रिलीज केला जाणार आहे. याशिवाय दक्षिण अमेरिकेतील ७५० स्क्रिन्स आणि जगभरातील सुमारे ३० देशांमध्ये १००० स्क्रिन्सवर हा चित्रपट रिलीज होणार आहे. याचसोबत ‘बाहुबली2’ भारतात सर्वाधिक स्क्रीन्सवर रिलीज होणारा चित्रपट ठरला आहे.

Web Title: 'Bahubali2's Editing Room' as a campfire!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.