बाहुबलीच्या अभिनेत्रीने ‘या’ व्यक्तीबरोबर असा धरला ठेका, पाहा व्हिडीओ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2018 16:06 IST2018-05-27T10:36:36+5:302018-05-27T16:06:45+5:30

बाहुबलीमध्ये आपल्या अदा दाखविणाºया या अभिनेत्रीचा एक फनी व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे.

Bahubali actress held this 'person with contract', see the video! | बाहुबलीच्या अभिनेत्रीने ‘या’ व्यक्तीबरोबर असा धरला ठेका, पाहा व्हिडीओ!

बाहुबलीच्या अभिनेत्रीने ‘या’ व्यक्तीबरोबर असा धरला ठेका, पाहा व्हिडीओ!

ग बॉस ९ मध्ये आपले जलवे दाखविणारी अभिनेत्री नोरा फतेही जबरदस्त डान्सर आहे. त्याचा नजारा प्रेक्षकांनी प्रेक्षकांना ‘बाहुबली’मध्ये बघावयास मिळाला आहे. या आयटम नंबरमध्ये नोराने जबरदस्त डान्स मूव्ज दाखविले. खरं तर नोरा नेहमीच तिच्या सिजलिंग डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करीत असते. याचदरम्यान, शनिवारी तिने इन्स्टाग्रामवर स्टार जस्ट सूलसोबतचा एक डान्स व्हिडीओ शेअर केला. व्हिडीओमध्ये ही जोडी शाहरूख खान आणि दीपिका पादुकोणच्या ‘चेन्नई एक्स्प्रेस’मधील ‘वन टू थ्री फोर...’ या गाण्यावर चांगलाच ठेका धरताना दिसत आहे. त्यांचा हा डान्स एवढा फनी आहे की, तुम्हाला हसू आवरणे मुश्किल होईल. 

व्हिडीओमध्ये नोरा आणि जस्ट सूल यांनी चांगलाच ठेका धरल्याचे दिसत आहे. दोघेही बेंधुद होऊन नाचत आहेत. नोराने जस्ट सूलसोबतचा आणखी एक व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. २६ वर्षीय नोरा फतेहीला खरी लोकप्रियता ‘बाहुबली’ (२०१५) या चित्रपटातील ‘मनोहारी...’ या गाण्यामुळे मिळाली. या गाण्यात ती जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. या गाण्यात प्रभाससोबत तिची केमिस्ट्री बघण्यासारखी आहे. त्याचबरोबर बिग बॉसच्या घरातही तिने आपल्या अदांनी प्रेक्षकांना घायाळ केले होते. नोरा जबरदस्त बॅली डान्सरही आहे. ती नेहमीच याबाबतचे व्हिडीओज् तिच्या इन्स्टाग्रामवर अपलोड करीत असते. 
">http://

नोरा गायक हाडी संधू याच्या पंजाबी गाण्यातही झळकली आहे. हाडीच्या ‘नाह’ या गाण्यात ती त्याच्या प्रेमिकेच्या भूमिकेत बघावयास मिळाली. नोरा फतेही इंडो-कॅनेडियन आहे. तिने ‘रोर : टायगर्स आॅफ द सुंदरबंस’ या बॉलिवूड चित्रपटातून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. त्यानंतर ‘क्रेजी कुक्कड फॅमिली’ या चित्रपटातही ती बघावयास मिळाली. मात्र तिचे हे दोन्ही चित्रपट बॉक्स आॅफिसवर फारसा करिष्मा दाखवू शकले नाहीत. परंतु चित्रपटातील मोठ्या भूमिकांपेक्षा ती आयटम सॉन्गमुळेच अधिक चर्चेत राहताना दिसत आहे. 
">http://

तेलगू चित्रपट ‘टेंपर, बाहुबली आणि किक-२’ या चित्रपटातील तिचे गाण्यांना खूप पसंती मिळाली. तिने ‘डबल बॅरल’ या मल्याळम चित्रपटातही आपल्या अदा दाखविल्या. नोराला इंग्रजी, हिंदी, फ्रेंच आणि अरेबिक भाषा अवगत आहेत. ती एक ट्रेंड डान्सर आहे. 

Web Title: Bahubali actress held this 'person with contract', see the video!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.