Bahubali 2 : फक्त १० तासांतच ट्रेलरने तोडले अनेक रेकॉर्ड; पिक्चर अभी बाकी है!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2017 20:53 IST2017-03-16T15:23:41+5:302017-03-16T20:53:41+5:30

​अभिनेता प्रभास आणि राणा दग्गुबती स्टारर ‘बाहुबली’चा सीक्वल ‘बाहुबली २’चा ट्रेलर अखेर रिलिज झाला अन् या ट्रेलरने असा काही धमाका केला की, इंडस्ट्रीमधील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Bahubali 2: Many records broken by the trailer within just 10 hours; The picture is still there! | Bahubali 2 : फक्त १० तासांतच ट्रेलरने तोडले अनेक रेकॉर्ड; पिक्चर अभी बाकी है!

Bahubali 2 : फक्त १० तासांतच ट्रेलरने तोडले अनेक रेकॉर्ड; पिक्चर अभी बाकी है!

िनेता प्रभास आणि राणा दग्गुबती स्टारर ‘बाहुबली’चा सीक्वल ‘बाहुबली २’चा ट्रेलर अखेर रिलिज झाला अन् या ट्रेलरने असा काही धमाका केला की, इंडस्ट्रीमधील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कारण केवळ दहाच तासांत ट्रेलरने अनेक रेकॉर्ड ब्रेक करीत नवा कीर्तिमान प्रस्थापित केला आहे. एवढ्या कमी वेळात कोट्यवधी लोकांनी ट्रेलर बघितला जाणारा बहुधा हा पहिलाच सिनेमा ठरला आहे. 

बाहुबलीचे ट्रेलर रिलिज झाल्याच्या दहा तासांनंतर जेव्हा आढावा घेण्यात आला तेव्हा हे ट्रेलर १४ कोटींपेक्षा अधिक लोकांनी बघितले होते. सिनेमा रिलिज होण्यास आणखी एक महिन्याचा अवधी असून, पहिल्याच दिवशी मारलेली ही मजल बरेच काही स्पष्ट करणारे आहे. गेल्या दोन वर्षांपासून ‘बाहुबली’च्या दुसºया भागाची प्रतीक्षा लागलेल्या प्रेक्षकांना ट्रेलरने मंत्रमुग्ध केले असले तरी, ‘पिक्चर अभी बाकी है’ असे बोलल्यास वावगे ठरू नये. 



‘बाहुबली’च्या पहिल्या भागात ‘कटप्पाने बाहुबलीला का मारले’ या प्रश्नाने प्रेक्षकांच्या मनात काहूर निर्माण केला आहे. प्रत्येकालाच या प्रश्नाचे उत्तर हवे असल्याने सिनेमाची आतुरता आता शिगेला पोहोचली आहे. सिनेमाच्या ट्रेलरवरून हे स्पष्ट झालेच आहे. कारण सायंकाळच्या पाच वाजेपर्यंत हे ट्रेलर १४ कोटींपेक्षा अधिक लोकांनी बघितले होते. तामिळ, मल्याळम, तेलगू, हिंदी आदि भाषांमध्ये हे ट्रेलर रिलिज करण्यात आले होते. सर्वाधिक तेलगू भाषेतील ट्रेलर बघितले गेले. 

या ट्रेलरमध्ये त्या सर्व काही गोष्टींचा समावेश करण्यात आला, ज्याची अपेक्षा केली जात होती. त्यामुळेच कदाचित प्रेक्षकांचा त्यास उदंड प्रतिसाद मिळत आहे. ट्रेलरमध्ये बाहुबलीच्या जवळपास सर्वच पात्रांना स्थान दिले आहे. त्याचबरोबर अ‍ॅक्शनचा जबरदस्त धमाका बघावयास मिळत आहे. प्रभास, राणा दग्गुबाती, सत्यराज, अनुष्का शेट्ट, तमन्ना भाटिया आणि राम्या सारख्या कलाकारांची झलक प्रेक्षकांना मोहित करीत आहे. आता हा सिनेमा रिलिज होण्याची आतुरता असून, येत्या २८ एप्रिल रोजी सिनेमागृहात याचा धमाका बघावयास मिळणार आहे. 

Web Title: Bahubali 2: Many records broken by the trailer within just 10 hours; The picture is still there!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.