​‘बाहुबली’च्या तोडीस तोड ‘भल्लालदेव’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2017 14:47 IST2017-04-02T09:17:40+5:302017-04-02T14:47:40+5:30

‘बाहुबली2’कडे डोळे लावून बसलेल्या चाहत्यांसाठी आजचा रविवार मोठ्ठे सरप्राईज घेऊन आला. होय, हे सरप्राईज म्हणजे, ‘बाहुबली2’चे एक नवे कोरे ...

'Bahubal' breaks out of 'Bahubali'! | ​‘बाहुबली’च्या तोडीस तोड ‘भल्लालदेव’!

​‘बाहुबली’च्या तोडीस तोड ‘भल्लालदेव’!

ाहुबली2’कडे डोळे लावून बसलेल्या चाहत्यांसाठी आजचा रविवार मोठ्ठे सरप्राईज घेऊन आला. होय, हे सरप्राईज म्हणजे, ‘बाहुबली2’चे एक नवे कोरे पोस्टर. या फोटोत राणा डग्गूबती अर्थात भल्लाल देव दिसतो आहे. ‘बाहुबली’शी चार हात करायला भल्लालदेव अगदी सज्ज असल्याचे या पोस्टरमध्ये दिसते आहे.
गत आठवड्यात ‘बाहुबली2’चे तेलगू म्युझिक लॉन्च करण्यात आले. एका भव्यदिव्य सोहळ्यात म्युझिक लॉन्चचा कार्यक्रम झाला. यानंतर आज रविवारी या चित्रपटाचे एक नवे पोस्टर जारी करण्यात आले. हे पोस्टर चाहत्यांच्या उत्सुकतेत आणखी भर घालणारे आहे.



लवकरच ‘बाहुबली2’ रिलीज होणार आहे. पण त्याआधी आणखी एक आनंदाची बातमी म्हणजे, ‘बाहुबली’सुद्धा रिलीज होणार आहे. होय, ‘बाहुबली2’च्या ट्रेलर लॉन्चवेळी दिग्दर्शक एस.एस. राजमौली यांनी याची घोषणा केली होती. चाहत्यांना बॅक टू बॅक दोन्ही चित्रपटांचा आनंद घेता यावा, हा यामागचा उद्देश आहे. खरे तर प्रमोशनची ही कल्पना ज्याची कुणाची असेल ती शानदारच म्हणायला हवी.

ALSO READ : ‘बाहुबली2’ आधी रिलीज होणार ‘बाहुबली: दी बिगिनिंग’!! पण का?

दोन वर्षांपूर्वी ‘बाहुबली : द बिगिनिंग’च्या  रुपात भारतीय सिनेमा इतिहासातील सर्वात भव्यदिव्य चित्रपट पाहायला मिळाला होता. या बिग बजेट चित्रपटातील व्हीएफएक्स इफेक्ट्स आणि अ‍ॅक्शन पाहून  प्रेक्षक आवाक झाले होते. हॉलीवूड अ‍ॅक्शनपटांनाही लाजवेल अशा भव्यतेमुळे या चित्रपटाने बॉक्स आॅफिसचे सर्व रेकॉर्ड या सिनेमाने मोडले. ‘बाहुबली : द बिगिनिंग’च्या ग्रँड यशाचा शिल्पकार असलेल्या बाहुबलीप्रमाणेच, यातील राणा डग्गूबतीने सुद्धा सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. या हँडसम हंक अभिनेच्या शक्तीशाली व क्रुर  भल्लालदेवच्या परफॉर्मन्समुळे प्रभासच्या ‘बाहुबली’ला तोडीस तोड व्हिलन मिळाला. त्यामुळेच ‘बाहुबली2’मध्ये राणाचा लूक आणि व्यक्तिरेखा कशी असेल, हे जाणून घेण्यास लोक आतूर झाले आहेत.

Web Title: 'Bahubal' breaks out of 'Bahubali'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.