‘पिंक’ मध्ये बच्चन बनणार वकील!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2016 23:54 IST2016-03-15T06:54:55+5:302016-03-14T23:54:55+5:30

 नॅशनल अ‍ॅवॉर्ड विजेता बंगाली दिग्दर्शक अनिरूद्ध रॉय चौधरी हे बॉलीवूडमध्ये त्यांचा दिग्दर्शकाच्या भूमिकेतील डेब्यू शूजित सरकार यांच्या आगामी ‘पिंक’ ...

Bachchan becomes lawyer in 'Pink'! | ‘पिंक’ मध्ये बच्चन बनणार वकील!

‘पिंक’ मध्ये बच्चन बनणार वकील!

 
ॅशनल अ‍ॅवॉर्ड विजेता बंगाली दिग्दर्शक अनिरूद्ध रॉय चौधरी हे बॉलीवूडमध्ये त्यांचा दिग्दर्शकाच्या भूमिकेतील डेब्यू शूजित सरकार यांच्या आगामी ‘पिंक’ चित्रपटातून करत आहे. यात अमिताभ बच्चन हे वकीलाच्या भूमिकेत दिसतील.

शूजित सरकार म्हणाले,‘ मी अमितजींसोबत काम करणार आहे. त्यांच्या आत्तापर्यंतच्या अभिनयाला लक्षात ठेवून स्क्रिप्ट बनवण्यात आली आहे. हे कॅरेक्टर आऊट आॅफ द बॉक्स कॅरेक्टर आहे. अमितजीच या भूमिकेला न्याय देऊ शकतात. त्यांनी यात वकीलाची भूमिका साकारली आहे.’

अमिताभ बच्चन यांनी आत्तापर्यंत ‘महान’, ‘जमानत’ आणि ‘शूटआऊट अ‍ॅट लोखंडवाला’ यात वकीलाची भूमिका केलेली आहे. आता बिग बी पिंक मधील भूमिकेसाठी देखील तयार आहेत. त्यांनी त्यांच्या चेहºयावर बरेच तास काम करणाºया ‘मेकअप आर्टिस्ट’चे देखील आभार मानले आहेत.

यात तापसी पन्नू, किर्ती कुल्हारी आणि अँण्ड्रेआ तरिअंग हे देखील असतील. शूजित सरकार म्हणतात,‘ चित्रपटाचे शूटिंग एप्रिलपर्यंत संपले पाहिजे. चित्रपटाचे अनेक भाग दिल्लीत शूट करण्यात येणार आहेत. 

Web Title: Bachchan becomes lawyer in 'Pink'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.