‘बेबीमून’ बॉलीवुडचा नवा ट्रेंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2016 16:28 IST2016-06-08T10:58:09+5:302016-06-08T16:28:09+5:30

हनीमूननंतर आता बी-टाऊनमध्ये बेबीमूनला जाण्याचा नवा ट्रेंड सुरु झालाय. बी-टाऊनच्या सेलिब्रिटी कपल्समध्ये याची क्रेझ जास्त दिसून येतेय. गर्भवती असणा-या ...

'Babymoon' Bollywood's new trends | ‘बेबीमून’ बॉलीवुडचा नवा ट्रेंड

‘बेबीमून’ बॉलीवुडचा नवा ट्रेंड

tyle="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">हनीमूननंतर आता बी-टाऊनमध्ये बेबीमूनला जाण्याचा नवा ट्रेंड सुरु झालाय. बी-टाऊनच्या सेलिब्रिटी कपल्समध्ये याची क्रेझ जास्त दिसून येतेय. गर्भवती असणा-या पत्नीला आराम मिळावा तसंच तिच्यासह रम्य आणि आनंददायी क्षण एकत्र घालवण्यासाठी हे लव्हबर्ड्स बाहेर फिरायला जातात.

शाहिद कपूर आणि मीरा राजपूत
बॉलीवुडचा अभिनेता शाहिद कपूर आणि मीरा राजपूत या लव्हबर्डनं बेबीमून अनुभवलं..मीरा गर्भवती असताना दोघांनीही मालदीवमध्ये अविस्मरणीय असे क्षण एकत्र घालवले.


रानी मुखर्जी आणि आदित्य चोप्रा
बॉलीवुडचे स्टार कपल म्हणजे रानी मुखर्जी आणि आदित्य चोप्रा.. रानी आई बनणार असल्याची बाब चोप्रा कुटुंबीयांनी गुप्त ठेवली होती. चोरी चोरी चुपके चुपके सा-यांच्या नजरा चुकवत हे कपल इटलीमध्ये लग्नबंधनात अडकलं होतं.. अगदी त्याचप्रमाणे आपल्या बाळाचाही जन्म परदेशात व्हावा अशी रानीची इच्छा होती. या कपलनं युरोपमध्ये बेबीमूनचा आनंद घेतला.


इमरान खान आणि अवंतिका मलिक खान
नव्या पाहुण्याचं आगमन होण्याआधी अभिनेता इमरान खान आणि त्याची पत्नी अवंतिका खान या कपलनं युरोपमध्ये आपलं बेबीमून सेलिब्रेट केलं. 2013च्या ख्रिसमसपासून ते मार्च 2014 पासून या कपलचं हे बेबीमून सुरु होतं.


राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी
अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा हेसुद्धा आपल्या बाळाचा जन्म होण्याआधी बेबीमूनसाठी गेले होते. आपल्या पहिल्या बाळाच्या आगमनाची वाट पाहणा-या राज आणि शिल्पानं फेब्रुवारी-2012 मध्ये स्वित्झर्लंडमध्ये निवांत आणि सुखद क्षण एन्जॉय केले...


विवेक ओबेरॉय आणि प्रियांका अल्वा
साथिया फेम विवेक ओबेरॉय यानंही आपल्या बिझी वर्क शेड्युलमधून वेळ काढत गर्भवती पत्नी प्रियांकासह युरोपमध्ये आनंदाचे क्षण एन्जॉय केले. मौजमजा करण्यासोबतच या कपलनं मनमुराद शॉपिंगचाही आनंद लुटला..

Web Title: 'Babymoon' Bollywood's new trends

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.