‘बेबी’च्या प्रीक्वेलमध्ये अक्षयचा कॅमिओ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2016 21:39 IST2016-07-21T16:09:43+5:302016-07-21T21:39:43+5:30
गेल्यावर्षी आलेल्या ‘बेबी’चा सिक्वल येणार असे मानले जात होते. ‘बेबी’चे दिग्दर्शक नीरज पांडे यांनीही या प्रोजेक्टवर काम सुरु असल्याचे ...
.jpg)
‘बेबी’च्या प्रीक्वेलमध्ये अक्षयचा कॅमिओ?
ग ल्यावर्षी आलेल्या ‘बेबी’चा सिक्वल येणार असे मानले जात होते. ‘बेबी’चे दिग्दर्शक नीरज पांडे यांनीही या प्रोजेक्टवर काम सुरु असल्याचे संकेत दिले होते. पण आपल्या चित्रपटांमध्ये अनेक सरप्राईज एलिमेंट देणारे नीरज याबाबतही सगळ्यांना आश्चर्याचा धक्का देणार आहे. या चित्रपटाचा सिक्वल नाही तर प्रीक्वेल बनणार आहे. ‘बेबी’मध्ये रॉ एजंट व त्याच्या मिशनची कहानी होती. प्रीक्वेलमध्ये या रॉ एजंटचे पूर्वायुष्य आणि एजंट बनण्यापर्यंतचा त्याचा प्रवास दिसणार आहे. ‘बेबी’च्या प्रीक्वेलमध्ये अक्षय कुमार काम करण्यास उत्सूक नाही. पण चित्रपटात पाहुणा कलाकार म्हणून मात्र तो असणार आहे. होय, यात अक्षय कॅमिओ रोलमध्ये असेल. हा प्रीक्वेल म्हणजे महिलाप्रधान चित्रपट असेल आणि ‘बेबी’मध्ये एजंट प्रियाची भूमिका साकारणारी तापसी पन्नू यात लीड रोलमध्ये दिसेल.