'बाहुबली' फेम अनुष्का शेट्टी दिग्दर्शकासोबत बांधणार लग्नगाठ?, जाणून घ्या याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2022 03:56 PM2022-12-22T15:56:48+5:302022-12-22T15:57:43+5:30

Anushka Shetty : 'बाहुबली' फेम अभिनेत्री अनुष्का शेट्टी पुन्हा एकदा तिच्या लग्नाच्या वृत्तांमुळे चर्चेत आली आहे.

'Baahubali' fame Anushka Shetty to tie the knot with the director?, know about it | 'बाहुबली' फेम अनुष्का शेट्टी दिग्दर्शकासोबत बांधणार लग्नगाठ?, जाणून घ्या याबद्दल

'बाहुबली' फेम अनुष्का शेट्टी दिग्दर्शकासोबत बांधणार लग्नगाठ?, जाणून घ्या याबद्दल

googlenewsNext

बाहुबली फेम अभिनेत्री अनुष्का शेट्टी (Anushka Shetty) पुन्हा एकदा तिच्या लग्नाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अनुष्का शेट्टी तेलगू दिग्दर्शकाशी लग्न करणार आहे. अभिनेत्रीने दिग्दर्शकासोबत दोन हिट चित्रपट केले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अनुष्का शर्माच्या लग्नात जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य उपस्थित राहणार आहेत.

अभिनेत्री अनुष्का शेट्टी पुन्हा एकदा तिच्या लग्नाच्या बातम्यांमुळे चर्चेत आली आहे. या वर्षी मे महिन्यात, अशी बातमी आली होती की ती दुबईस्थित एका व्यावसायिकाशी लग्न करणार आहे. मात्र हे वृत्त निव्वळ अफवा ठरली आहे. आता अनुष्का एका तेलगू दिग्दर्शकाशी लग्न करणार आहे. ज्याच्यासोबत तिने दोन हिट चित्रपट केले आहेत. 


अनुष्काचे याआधी अनेक सेलिब्रिटींसोबत रिलेशनशीपमध्ये असल्याचे सांगण्यात येत आहे. बाहुबलीनंतर ती प्रभासला डेट करत असल्याच्या अफवा पसरल्या होत्या आणि दोघे लग्न करण्याच्या विचारात असल्याचे वृत्तही समोर आले होते. अफवा पसरू लागल्यावर, ३९ वर्षीय व्यक्तीने आपले मौन सोडले आहे आणि सर्व अफवांचे खंडन केले आहे. ती म्हणाली, “मी प्रभासला १५ वर्षांहून अधिक काळापासून ओळखते आणि तो माझ्या ३ AM मित्रांपैकी एक आहे. आम्ही सहसा जोडलेले असतो कारण आम्ही दोघे विवाहित नाही. आमच्यात काही झालं असतं तर एव्हाना ते बाहेर आले असते.
याआधी काही रिपोर्ट्समध्ये असे म्हटले होते की, अभिनेत्रीला हैदराबादस्थित बिझनेसमनशी लग्न करायचं आहे. रणजी ट्रॉफीमध्ये दक्षिण भारतीय संघाकडून खेळणाऱ्या क्रिकेटपटूवर अनुष्काचे प्रेम होते, अशीही अफवा पसरली होती. मात्र तिने या सर्व गोष्टींना नकार देत ‘लग्न झाल्यावर नक्कीच सर्वांना सांगेन’ असे सांगितले.

अनुष्का शेट्टी ही साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र बाहुबली या चित्रपटातून तिला जगभर प्रसिद्धी मिळाली. तिच्या आगामी चित्रपटाबद्दल सांगायचे तर, अभिनेत्री लवकरच राघव लॉरेन्सच्या चंद्रमुखी २ चित्रपटात दिसणार आहे.

Web Title: 'Baahubali' fame Anushka Shetty to tie the knot with the director?, know about it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.