'बागी ४'ची बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई, टायगर श्रॉफ-संजय दत्तच्या सिनेमाने दोन दिवसात कमावले 'इतके' कोटी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2025 10:15 IST2025-09-07T10:14:52+5:302025-09-07T10:15:40+5:30
'बागी ४' सिनेमाचा बॉक्स ऑफिस रिपोर्ट समोर आला आहे. टायगर श्रॉफ-संजय दत्तच्या जोडीला प्रेक्षकांचं चांगलं प्रेम मिळतंय

'बागी ४'ची बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई, टायगर श्रॉफ-संजय दत्तच्या सिनेमाने दोन दिवसात कमावले 'इतके' कोटी
टायगर श्रॉफ आणि संजय दत्त यांची मुख्य भूमिका असलेला 'बागी ४' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, पहिल्या दोन दिवसांतच चित्रपटाने बंपर कमाई केली आहे. 'बागी' चित्रपटाच्या आजवरच्या फ्रँचायझींपैकी 'बागी ४' हा अतिशय हिंसक, रक्तरंजित आणि भावनिक कथा असलेला सिनेमा म्हणून ओळखला जातोय. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. जाणून घ्या 'बागी४'च्या कमाईबद्दल.
'बागी ४' सिनेमाची कमाई
बॉक्स ऑफिस रिपोर्टनुसार, 'बागी ४' ने दुसऱ्या दिवशी चांगली कमाई करत प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. पहिल्या दिवशी चित्रपटाने तिकीट खिडकीवर ९० कोटी रुपयांची कमाई केली होती, तर दुसऱ्या दिवशीही कमाईचा वेग कायम राहिला. चित्रपटाने दुसऱ्या दिवशी तब्बल ८५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. यासह, केवळ दोन दिवसांत 'बागी ४' ने बॉक्स ऑफिसवर एकूण १७५ कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे.
बॉक्स ऑफिस तज्ञांच्या मते, 'बागी ४' हा २०२५ मधील सर्वात यशस्वी चित्रपटांपैकी एक ठरू शकतो. चित्रपटाच्या कमाईचा हा वेग पाहता, हा चित्रपट लवकरच २०० कोटींचा टप्पा पार करेल अशी अपेक्षा आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अहमद खान यांनी केले असून, यात जबरदस्त अॅक्शन आणि थरार आहे. टायगर श्रॉफच्या अॅक्शन दृश्यांनी आणि संजय दत्तच्या खलनायकी भूमिकेने प्रेक्षकांचं चांगलंच लक्ष वेधलं आहे. चित्रपटात टायगर, संजय दत्त यांच्यासोबत अभिनेता श्रेयस तळपदे याशिवाय अभिनेत्री हरनाझ संधू, सोनम बाजवा हे कलाकारही प्रमुख भूमिकेत आहेत.