आयुषमान ‘कभी हाँ कभी ना’ रिमेकमध्ये काम करण्यास तयार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2016 02:17 IST2016-02-17T09:17:28+5:302016-02-17T02:17:28+5:30
बॉलीवूडमध्ये गेल्या काही वर्षात अनेक बायोपिक्स आणि रिअल लाईफ स्टोरीज वर काम करण्यात आले. बॉलीवूड अभिनेता आयुषमान खुराना याला ...

आयुषमान ‘कभी हाँ कभी ना’ रिमेकमध्ये काम करण्यास तयार
ब लीवूडमध्ये गेल्या काही वर्षात अनेक बायोपिक्स आणि रिअल लाईफ स्टोरीज वर काम करण्यात आले. बॉलीवूड अभिनेता आयुषमान खुराना याला वाटते की, ‘रिमेक्स या चित्रपटाच्या प्रकारात मला काम करायला आवडेल असे मला वाटत नाही. पण, शाहरूख खानच्या १९९४ चा हिट चित्रपट ‘कभी हाँ कभी ना’ या चित्रपटाच्या रिमेकमध्ये काम करायला जरूर आवडेल. ’ तो पुढे म्हणतो,‘ मी रिमेक्सचा खुप मोठा फॅन नाही. पण मला ‘कभी हाँ कभी ना’ चित्रपटाचा हिस्सा व्हायला नक्की आवडेल. काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला इम्तियाज अली चा चित्रपट ‘रॉकस्टार’ याचाही हिस्सा व्हायला मला आवडेल. कारण, एक गायक असण्याचा फायदा करून घेता येतो.