‘लवरात्रि’चे नवे गाणे ‘तेरा हुआ’ रिलीज! आतिफ असलमचा आवाज अन् आयुष-वरिनाची जबरदस्त केमिस्ट्री!!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 12:41 IST2018-08-30T12:40:50+5:302018-08-30T12:41:44+5:30
आज ‘लवरात्रि’ या चित्रपटाचे तिसरे गाणे रिलीज झाले. ‘तेरा हुआ’ असे या रोमॅन्टिक गाण्याचे शब्द आहेत.

‘लवरात्रि’चे नवे गाणे ‘तेरा हुआ’ रिलीज! आतिफ असलमचा आवाज अन् आयुष-वरिनाची जबरदस्त केमिस्ट्री!!
सलमान खान प्रॉडक्शनचा ‘लवरात्रि’ हा चित्रपट रिलीज होण्यास एक आठवड्यांचा काळ उरलाय. या चित्रपटाद्वारे दोन नवीन चेहरे बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेत आहेत. एक म्हणजे, सलमानचा मेहुणा आयुष शर्मा आणि दुसरी म्हणजे, वरिना हुसैन. आयुष हा सलमानची बहीण अर्पिता खान हिचा पती आहे. चित्रपटाचा ट्रेलर तुम्ही बघितलाच. शिवाय चित्रपटाची दोन गाणी ‘चोगाडा’ आणि ‘अख लड जावे’ही बघितलीत. या दोन्ही गाण्यात आयुष आणि वरिनाची जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळाली होती. आज या चित्रपटाचे तिसरे गाणे रिलीज झाले. ‘तेरा हुआ’ असे या रोमॅन्टिक गाण्याचे शब्द आहेत.
Yeh lo, aa gaya… #Loveratri ka naya gaana… very romantic! #TeraHua! I toh loved it!https://t.co/YmilNpMUjM#LoveTakesOver!@SKFilmsOfficial@aaysharma@Warina_Hussain@itsaadee@tanishkbagchi@manojmuntashir@azeem2112 @Tseries@abhiraj21288
— Salman Khan (@BeingSalmanKhan) August 30, 2018
बडोद्याच्या रस्त्यांवर फिरता फिरता आयुष व वरिनाचे प्रेम बहरते, असे या गाण्यात दिसतेय. पाकिस्तानी सिंगर आतिफ असलम याने गायलेल्या या गाण्याचे शब्द आहेत मनोज मुंतासिर याचे. शब्बीर अहमद आणि अराफात महमूदच्या मदतीने त्याने हे गाणे लिहिले आहे. तनिष्क बागचीने कम्पोज केलेले हे गाणे सलमानने त्याच्या सोशल अकाऊंटवर शेअर केले आहे.
अभिराज मिनावाला दिग्दर्शित ‘लवरात्रि’ हा चित्रपट येत्या ५ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. राम कपूर आणि रोनित रॉय यात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. याशिवाय अरबाज खान आणि सोहेल खान कॅमिओ रोलमध्ये आहेत.