कंगणाचा प्रामाणिक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2016 16:10 IST2016-04-07T23:10:07+5:302016-04-07T16:10:07+5:30

‘राईचा पर्वत करणे’ हा तर मीडियाचा स्वभाव आहे. आणि गोष्ट जर बॉलिवूड सेलिब्रेटींबद्दल असेल तर मुळ विषयसोडून केवळ गॉसिप ...

Authentic disclosure of bracelet | कंगणाचा प्रामाणिक खुलासा

कंगणाचा प्रामाणिक खुलासा

ाईचा पर्वत करणे’ हा तर मीडियाचा स्वभाव आहे. आणि गोष्ट जर बॉलिवूड सेलिब्रेटींबद्दल असेल तर मुळ विषयसोडून केवळ गॉसिप सुरू होते. तसेच काहीसे कंगणा-हृतिकच्याबाबतीत झाले आहे.

हृतिकच्या घटस्फोटाला कंगणा जबाबदार असल्याची चर्चा होती. त्यानंतर कंगणाने हृतिकचा थेट उल्लेख न करता त्याला ‘सिली एक्स’ म्हटले.

वेळोवेळी दोघांनी अफेयरबद्दल नकार दिला. मात्र, काही दिवसांपूर्वी हृतिकने कंगणाला मानहानीचा केली म्हणून कायदेशीर नोटिस पाठविली. मग कंगणानेदेखील हृतिक नोटिस पाठविली.

मीडियाला तर यामुळे आयते कुराणच मिळाले. आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. एकमेकांच्या खाजगी गोष्टी उघड करणे सुरू झाले. कंगणाने माझी माफी मागावी, असे हृतिकचे म्हणने आहे.

यावर कंगणाने नुकताच खुलासा केला आहे. तो वाचा तिच्याच शब्दात...

कायदेशीर प्रकारणांत नोंद घेतलेल जबाब प्रमाण मानले जातात. चहाट्या-गप्पा-गॉसिप नाही. मी स्पष्टपणे खुलासा करू इच्छिते की, माझ्या विरोधात मानहानीचा दावा करणाऱ्या प्रतिपक्षाने (हृतिक) तो सिद्ध केला तर मी जाहीरपणे माफी मागेल. प्रतिपक्षाला मी विनंती करते की, त्यांनी सुरू केलेल्या कायेदशीर लढाईला कायदेशीर पद्धतीनेच सामोरे जावे. त्याला मीडिया इश्यू बनवू नये.

त्यांना जर मी माफीच मागवी असेल वाटत असेल तर त्यांनी ब्लॅकमेल किंवा धमक्या देऊन काही उपयोग होणार नाही. त्यांनी मला समजेल अशा पद्धतीने त्यांचा मुद्दा मांडावा. माझे वकील अशा धमक्या आणि खोट्यानाट्या आरोपांना उत्तर देण्यासाठी समर्थ आहे. आणि तसेही मी मुलगी आहे म्हणून घाबरून जाणार नाही.

माझ्या प्रेम कविता, पत्र किंवा फोटो सार्वजनिक करण्याच्या भीतीने मी माफी मागणार नाही. माझा भूतकाळ, माझे प्रेमसंबंध, माझे शरीर आणि इच्छा-आकांक्षाची मला लाज वाटत नाही. त्यामुळे माझी बदनामी करून माझ्यावर दडपण आणने व्यर्थ आहे.

समोरच्या पक्षाला जर खरंच असे वाटत असेल की मी माफी मागावी तर त्यांनी अशा प्रकारच्या गॉसिपच्या आड राहून माझ्यावर निशाना साधण्याऐवजी थेट चर्चा करावी. मी आणि माझे वकील या प्रकरणाला संपुष्टात आणण्यासाठी सर्व ती मदत करण्यास तयार आहोत. एकमेकांच्या भावना दुखवल्यामुळे कोणाचे भले होणार नाही.


लवकरात लवकर कंगणा-हृतिकचे भांडण मिटावे अशी आमचीदेखील इच्छा आहे.

याविषयी आणखी वाचा :

‘लव्ह हेट वॉर’ला नवे वळण; हृतिकच्या FIR मध्ये कंगनाचे नाव

हृतिक-कंगणा यांनी एकमेकांना पाठवल्या नोटिसा?

Web Title: Authentic disclosure of bracelet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.