अथिया शेट्टीचे रिटेक्सवर रिटेक्स; वैतागले अनीस बज्मी !!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2017 16:03 IST2017-05-04T10:33:02+5:302017-05-04T16:03:02+5:30

सुनील शेट्टीची लाडकी लेक अथिया शेट्टी सध्या दिग्दर्शक अनीस बज्मी यांच्या ‘मुबारका’मध्ये काम करतेय, हे तुम्ही जाणताच. याच चित्रपटाच्या ...

Athiya Shetty's Retakesver Ritex; Witagle anis bajmi !! | अथिया शेट्टीचे रिटेक्सवर रिटेक्स; वैतागले अनीस बज्मी !!

अथिया शेट्टीचे रिटेक्सवर रिटेक्स; वैतागले अनीस बज्मी !!

नील शेट्टीची लाडकी लेक अथिया शेट्टी सध्या दिग्दर्शक अनीस बज्मी यांच्या ‘मुबारका’मध्ये काम करतेय, हे तुम्ही जाणताच. याच चित्रपटाच्या सेटवरून एक बातमी आलीय.  पण बातमी ब-याच अंशी अथियाच्या चाहत्यांना निराश करणारी आहे. होय, सेटवरच्या सूत्रांची मानाल तर, अनीस बज्मी अथियामुळे जाम वैतागले आहेत. केवळ इतकेच नाही, तर तुला आणखी बरेच काही शिकायचे आहे, असे त्यांनी अथियाला सांगून टाकले आहे.
आता प्रकरण काय, तर तेही ऐका. ‘मुबारका’च्या सेटवर अथियाचे रिटेक्सवर रिटेक्स होत आहेत.  अनीस बज्मी यांना मनासारखा सीन्स मिळत नाहीय. शिवाय या सगळ्यांत अख्ख्या युनिटाचा  वेळ जातोय. अर्जुन कपूर, अनिल कपूर, इलियाना डिक्रूज यांचाही वेळ वाया जातोय. एकंदर काय तर अनीस बज्मी अथियाच्या अ‍ॅक्टिंग स्कीलबद्दल जराही समाधानी नाहीत. अथियाकडून मनासारखे काम काढून घेण्यास त्यांना बराच घाम गाळावा लागतोय.

ALSO READ : तुम्ही ऐकलतं का? होय, आथिया शेट्टीला करायचीय ‘अ‍ॅक्शन’ !

याबद्दल खुद्द अनीस यांना विचारले तेव्हा, त्यांची नाराजी अप्रत्यक्षपणे झळकलीच. ते थेट बोलले नाहीत पण त्यांचा सूर तसाच होता. अथियाने केवळ एक चित्रपट केलाय. नव्या कलाकारांना शूटींगवेळी काही समस्या येतातच. अनिल कपूरसारख्या दिग्गज अभिनेत्यासमोर नर्व्हस होणे साहजिक आहे, असे ते म्हणाले. अथियाला भविष्यात बरेच काही शिकण्याची गरज आहे, हे सांगायलाही ते विसरले नाहीत. 
अथिया यापूर्वी ‘हिरो’ या चित्रपटात दिसली होती. यात सूरज पांचोली तिच्या अपोझिट दिसला होता. सलमान खानने अथिया व सूरज या दोघांना ब्रेक दिला होता. अर्थात हा चित्रपट दणकून आपटला होता. त्यामुळे अथियाला या दुसºया चित्रपटाकडून बºयाच अपेक्षा आहेत. पण शेवटी रिझल्ट देणे हे अथियाच्याच हाती आहे.

Web Title: Athiya Shetty's Retakesver Ritex; Witagle anis bajmi !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.