आशा भोसलेंच्या बंद बंगल्याचे वीज बिल - ₹ ५३ हजार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2016 15:29 IST2016-12-07T15:27:10+5:302016-12-07T15:29:12+5:30
राज्यात वीज बिलासंबंधी असणाऱ्या तक्रारी काही थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. महावितरणाच्या गलथान कारभारचा फटका केवळ सामान्य जनतेला बसतो असे ...

आशा भोसलेंच्या बंद बंगल्याचे वीज बिल - ₹ ५३ हजार
र ज्यात वीज बिलासंबंधी असणाऱ्या तक्रारी काही थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. महावितरणाच्या गलथान कारभारचा फटका केवळ सामान्य जनतेला बसतो असे नाही. जेष्ठ गायिका अशा भोसेलेंनासुद्धा त्याची झळ सोसावी लागली आहे.
आपल्या लोणावळा स्थित बंगल्याचे वीज बिल पाहून त्या स्वत: अचंबित झाल्या. नुकतेच त्यांना ५३ हजार ५७९ रु. एवढे विजेचे बिल आहे.
विशेष म्हणजे तुंगर्ली रोडवरील या बंगल्याचा वापर अगदी नगण्य आहे. अधिक काळ तर हा बंगला बंदच असतो आणि तरीदेखील अव्वाच्या सव्वा वीज बिल येतेय म्हटल्यावर त्यांचा संताप होणे स्वभाविक आहे. सुत्रांनुसार, त्यांना ५० ते ८० हजरा रुपयांदरम्यान बिल येते.
महराष्ट्र सरकारने या प्रकाराणाची त्वरीत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. राज्याचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांनी स्वत: अशातार्इंना विश्वास देत आपण या प्रकारणाच्या मुळाशी जाऊन एवढे बिल कसे आले याचे कारण शोधण्याचे निर्देश दिले असल्याचे सांगितले.
![]()
लगा लगा लगा शॉक लगा! : आशा भोसले
बिल बनवणाऱ्या संगणकीय प्रणालीमध्ये आलेल्या बिघाडामुळे असे झाले असावे, असा प्राथमिक अंदाज आहे. मुंबई शहरा विभागाचे भाजपा प्रमुख आशिष शेलार यांनी वैयक्तिकरीत्या हा प्रश्न संबंधित मंत्र्याच्या निदर्शनास आणून दिला. जाहीर केलेल्या निवेदनात त्यांनी माहिती दिली की, ‘पुणे शहरातील अधिकाऱ्याला या प्रकरणाचा छडा लावण्याच्या सूचना राज्य सरकारकडून देण्यात आल्या आहेत.’
अशातार्इंचा हा बंगला लोणावळ्यातील तुंगर्ली तलावाशेजारी आहे. त्या क्वचितच या घराचा वापर करतात. असे असूनही सप्टेंबर महिन्याचे वीज बिल १६ हजार ४११ रुपये आले होते. याबरोबरच मागील बिले न भरल्यामुळे ३७ हजार १६८ रुपयांची थकबाकीसुद्धा त्या बिलामध्ये समाविष्ट करण्यात आली.
चौकशीअंती काय निष्पण्ण होते हे तर येणाऱ्या काही दिवसांमध्ये कळेलच; परंतु आशातार्इंसारख्या सेलिब्रेटींच्या प्रश्नावर एवढ्या झटपट चक्रे फिरवण्याची तत्परता सामान्य जनतेच्या प्रश्नाच्यावेळी दाखवण्यात येईला का हा खरा प्रश्न आहे. तुम्हाला काय वाटते हे आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा.