​बॉलिवूड डेब्यूसाठी आर्यन खान सज्ज !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2017 11:33 IST2017-06-21T06:03:25+5:302017-06-21T11:33:25+5:30

बॉलिवूडचा किंग शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान त्याच्या आईचा खूपच लाडका आहे. नुकताच त्याचा आईसोबतचा लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर ...

Aryan Khan ready for Bollywood debut! | ​बॉलिवूड डेब्यूसाठी आर्यन खान सज्ज !

​बॉलिवूड डेब्यूसाठी आर्यन खान सज्ज !

लिवूडचा किंग शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान त्याच्या आईचा खूपच लाडका आहे. नुकताच त्याचा आईसोबतचा लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  हा फोटो स्वत: आर्यनने इन्स्टाग्रामवर शेअर केला असून त्या फोटोखाली ‘द बर्थ गिव्हर’ म्हणजेच जन्म देणारी असे कॅप्शन टाकले आहे.
या फोटोत आर्यन एका डिस्ट्रेस्ड व्हाइट टी-शर्टमध्ये दिसत असून मेस्सी हेअरस्टाइल केली आहे. विशेष म्हणजे या फोटोत तो त्याच्या वडिलांची कार्बन कॉपी वाटत आहे. 

दुसरी गोष्ट म्हणजे आर्यन बॉलिवूड डेब्यू करणार अशा आशयाचे वृत्त बऱ्याच दिवसांपासून ऐकायला मिळत आहे, मात्र आतापर्यंत अधिकृत समजले नाही. पण त्याचा लेटेस्ट फोटो आणि त्याची कॅज्युअल स्टाइलवरुन असे वाटते की, आर्यन आपल्या बिग बॉलिवूड डेब्यूसाठी पूर्णत: सज्ज झाला आहे.
आर्यन खानने लंडनमधील प्रसिद्ध ‘सेव्हेनआॅक्स स्कूल’मधून आपले शिक्षण पूर्ण केले आहे. तो सध्या मित्रांसोबत पार्ट्यांमध्ये दिसत असतो. आर्यनने शिक्षणाबरोबरच मार्शल आर्ट्सदेखील करीत आहे. आर्यनचा  पर्सनल स्टाइल खूपच कु ल आणि कॅज्युअल आहे. तो बहुतांश कॅज्युअल टीज आणि डेनिम्समध्येच दिसतो.  

Also Read : ​शाहरूखचा मुलगा आर्यन खान याच्या बॉलिवूड डेब्यूविषयी इथे आहे खास माहिती!!

Web Title: Aryan Khan ready for Bollywood debut!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.