​आमीरमुळे ‘एआर’ने सोडला ‘सीक्रेट सुपरस्टार’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2016 18:09 IST2016-08-06T12:39:55+5:302016-08-06T18:09:55+5:30

होय, बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान याच्यामुळे संगीतकार व गायक ए.आर. रहमान आणि गीतकार प्रसून जोशी यांनी ‘सीक्रेट सुपरस्टार’ ...

'Arya' left for 'Secret superstar' because of Amir! | ​आमीरमुळे ‘एआर’ने सोडला ‘सीक्रेट सुपरस्टार’!

​आमीरमुळे ‘एआर’ने सोडला ‘सीक्रेट सुपरस्टार’!

य, बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान याच्यामुळे संगीतकार व गायक ए.आर. रहमान आणि गीतकार प्रसून जोशी यांनी ‘सीक्रेट सुपरस्टार’ हा चित्रपट सोडल्याची खबर आहे. आमीरचा जुना मॅनेजर अद्वैत चंदन हा या चित्रपटाचा निर्माता आहे. आमीर यात एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. मात्र आमीरमुळेच रहमान आणि प्रसून  यांनी हा चित्रपट सोडल्याची चर्चा आहे. सूत्रांच्या मते, आमीर खान चित्रपटासाठी अजिबात वेळ देऊ शकत नाहीयं. यामुळे चित्रपट जराही पुढे सरकू शकलेला नाही. खरे तर याचवर्षी हा चित्रपट फ्लोरवर येणार होता. मात्र आमीर ‘दंगल’मध्ये बिझी असल्याने असे होऊ शकले नाही. याच कारणामुळे ए. आर. रहमान आणि प्रसून जोशी या चित्रपटापासून वेगळे झाल्याचे कळते. अर्थात ‘दंगल’ पूर्ण झाल्यावर आमीर हा चित्रपट हाती घेऊ शकतो. कदाचित यानंतर रहमान व प्रसून यांचे मन वळवण्यात आमीर यशस्वी ठरेल..
‘सीक्रेट सुपरस्टार’ हा एका युवा सिंगरचा प्रवास आहे. यात आमीर एका रॉकस्टारच्या भूमिकेत दिसू शकतो.

Web Title: 'Arya' left for 'Secret superstar' because of Amir!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.