‘या’ कॅनेडियन मुलीशी केले अरुणोदय सिंगने लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2016 11:38 IST2016-12-15T11:21:31+5:302016-12-15T11:38:06+5:30

अरुणोदय सिंग आणि गर्लफ्रेंड ली एल्टन यांनी भोपाळ येथे एका घरगुती समारंभात विवाह केला.

Arunoday Singh is married to a Canadian girl | ‘या’ कॅनेडियन मुलीशी केले अरुणोदय सिंगने लग्न

‘या’ कॅनेडियन मुलीशी केले अरुणोदय सिंगने लग्न

लीवूड अभिनेता अरुणोदय सिंगचे स्टेटस आता ‘बॅचलर’ न राहता ‘मॅरिड’ असे झाले आहे. अडीच वर्षांच्या डेटिंगनंतर त्याने कॅनेडियन गर्लफ्रेंड ली एल्टनशी राजेशाही थाटात लग्नगाठ बांधली.

भोपाळ येथे त्याच्या घरी हा विवाहसोहळा पार पडला. संपूर्णपणे हिंदू प्रथेप्रमाणे झालेल्या या लग्नासाठी नववधूचे कुटुंबिय कॅनडातील न्यूफाउंडलँड येथून भारतात आले होते. अरुणोदयची न्यूयॉर्क स्थित फोटोग्राफर बहीण अंबिकासुद्धा गेल्या महिनाभरापासून लग्नाच्या तयारीसाठी घरी आली होती.

तीन दिवस चाललेल्या या सोहळ्याला ‘अ डे-ली अफेअर’ असे नाव देण्यात आले. नवरदेवाचे जवळचे मित्र गायक अंकुर तिवारी, होस्ट सायरस शकुर, गौरव कपूर, युधिष्ठिर उर्स व पत्नी आदिती मेहरा, सिनेमॅटोग्राफर विकास नौलखा, व्हीजे शीतल मल्हार, अभिनेत्री सॅराह जेन डियाज्, लेखिका सुहास अहुजा यावेळी उपस्थित होते.
 

अरुणोदयचे बालपण ज्या घरात गेले तेथेच हा विवाहसोहळा संपन्न झाला. विशेष म्हणजे सर्व जेवण पारंपरिक पद्धतीने स्थानिक शेफस्ने बनविले होते. नवरदेवाचे प्रिय पेट डॉग्ससुद्धा त्याच्या वरातीमध्ये सामील झाले. फार्मवर धमाल करत सर्वांनी मेंहदी काढली आणि बेयॉन्सेची गाणे जोरजोरात गाऊन सेलिब्रेशन केले.
 
 


मेंहदी, संगीत आणि लग्न जरी घरी झाले असले तरी रिसेप्शन भोपाळच्या शिवराजपूर पॅलेस येथे ठेवण्यात आले होते. कार्यक्रमासाठी बागेला फार छान सजवण्यात आले होते. ड्रोनच्या साहाय्याने नवदाम्पत्याच्या या स्पेशल दिवसाचा प्रत्येक क्षण टिपण्यात आला. मंगळवारी रात्री दोघांच्या कुटुंबियांनी आकाशदिवे सोडून विवाहसोहळ्याची सांगता केली.

अरुणोदय या वर्षी आशुतोष गोवारीकरच्या ‘मोहेंजोदडो’मध्ये हृतिकशी दोन हात करताना दिसला होता. गोव्याच्या एका योगाविषयक कार्यक्रमात लीसोबत त्याची भेट घडली आणि ते प्रेमात पडले. गोव्यात ली एक गार्डन रेस्टॉरंट चालवते. त्यामुळे हे कपल मुंबईतील जुहू येथील अपार्टमेंट आणि गोव्यातील घरात वास्तव्याला असतात. ‘ली जेथे असते तेच माझे घर’ असे अरुणोदयने म्हटले होते.

Web Title: Arunoday Singh is married to a Canadian girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.