बाहुबलीची हत्या करणाऱ्या कटप्पा विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2017 21:44 IST2017-05-23T15:21:54+5:302017-05-23T21:44:27+5:30

‘कटप्पाने बाहुबलीला का मारले?’ या संबंध भारताला पडलेल्या प्रश्नाचे उत्तर ‘बाहुबली-२’मध्ये मिळाले आहे. मात्र तरीदेखील कटप्पाच्या मागचे शुक्लकाष्ट संपण्याचे ...

Arrest warrant issued against Battalion killer! | बाहुबलीची हत्या करणाऱ्या कटप्पा विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी!

बाहुबलीची हत्या करणाऱ्या कटप्पा विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी!

टप्पाने बाहुबलीला का मारले?’ या संबंध भारताला पडलेल्या प्रश्नाचे उत्तर ‘बाहुबली-२’मध्ये मिळाले आहे. मात्र तरीदेखील कटप्पाच्या मागचे शुक्लकाष्ट संपण्याचे नाव घेत नाही. कारण कटप्पा म्हणजेच अभिनेते सत्यराज यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. 

‘बाहुबली’ सिरीजच्या दोन्ही चित्रपटांत ‘कटप्पा’ ही महत्त्वाची भूमिका साकारणारे अभिनेते सत्यराज हे गेल्या काही दिवसांपासून कायदेशीर अडचणीत सापडले आहेत. २००९ मध्ये त्यांच्यावर मानहानीचा खटला दाखल करण्यात आला होता. आता त्याच संदर्भातील न्यायालयीन प्रक्रिया सुरू असून, उटी न्यायदंडाधिकाºयांनी सत्यराज यांच्यासह दाक्षिणात्य अभिनेते सूर्या, सरथकुमार व अन्य पाच जणांविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले आहे. 



यासर्व कलाकारांविरोधात वॉरंट जारी केल्याचे वृत्त सोशल मीडियावर पसरताच ट्विटरवर सूर्याच्या बचावासाठी त्याच्या चाहत्यांनी पुढाकार घेतला. न्यायालयाच्या वॉरंटला तीव्र विरोध करतानाच ‘वुई सपोर्ट सूर्या’ या हॅशटॅग अंतर्गत ट्विटरवर ट्रेंडिंग करण्यात आले. हा दिवसभर सुरू असल्याने चाहत्यांनी या सर्वांना विनाकारण गोवले जात असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. 

एका तामीळ दैनिकाच्या वृत्तानुसार, २००९ दाखल केलेले हे प्रकरण असे की, त्यावेळी एक लेख प्रकाशित करण्यात आला होता. त्या लेखामध्ये साउथमधील अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींसंदर्भात वेश्या वृत्तीचा केलेला आरोप प्रसिद्ध करण्यात आला होता. या लेखाला चित्रपटसृष्टीशी संबंधित अनेकांनी कडाडून विरोध केला होता. नजीर संगम यांनी बोलाविलेल्या पत्रकार परिषदेत तर या अभिनेत्यांनी मीडियावाल्यांशी चांगलीच हुज्जत घातली होती. त्यानंतर वरिष्ठ पत्रकार रोजारियो मारिया सुसाई यांनी ऊटी न्यायदंडाधिकाºयांकडे याबाबतची तक्रार केली होती. 



दरम्यान, या प्रकरणातील सर्वच अभिनेत्यांनी मद्रास उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करीत हा खटला रद्द केला जावा, अशी मागणी केली होती. मात्र न्यायालयाने ही याचिका फेटाळल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. दरम्यान, उटी न्यायदंडाधिकाºयांनी या प्रकरणातील सर्वच अभिनेत्यांना गेल्या १५ मे रोजी न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते. परंतु कोणीही हजर राहिले नसल्याने न्यायदंडाधिकाºयांनी त्यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले आहे. 

Web Title: Arrest warrant issued against Battalion killer!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.