जान्हवी कपूरसोबत झाले असे काही की भडकला अर्जुन कपूर !!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2018 10:42 IST2018-04-13T05:11:11+5:302018-04-13T10:42:39+5:30

श्रीदेवींच्या मृत्यूनंतर अर्जुन कपूर आणि त्याची बहीण अंशुला कपूर हे दोघेही जान्हवी व खुशी या सावत्र बहिणींना फुलासारखे जपतांना ...

Arjun Kapoor, who has somehow happened with Jhanvi Kapoor !! | जान्हवी कपूरसोबत झाले असे काही की भडकला अर्जुन कपूर !!

जान्हवी कपूरसोबत झाले असे काही की भडकला अर्जुन कपूर !!

रीदेवींच्या मृत्यूनंतर अर्जुन कपूर आणि त्याची बहीण अंशुला कपूर हे दोघेही जान्हवी व खुशी या सावत्र बहिणींना फुलासारखे जपतांना दिसताहेत. एकेकाळी अर्जुन व अंशुला जान्हवी व खुशीचे नावही ऐकणे पसंत करायचे नाहीत. पण श्रीदेवींच्या निधनानंतर दोघेही जान्हवी व खुशीच्या कधी नव्हे इतक्या जवळ आले आहेत. आपल्या सावत्र बहिणींना आणि वडिलांना आपली गरज आहे, याची जाणीव अर्जुनला झाली आहे आणि अशास्थितीत अर्जुन खंबीरपणे त्यांच्या पाठीशी आहे. याचा पुरावा अलीकडे पाहायला मिळाला. होय, जान्हवीविरोधात एका संकेतस्थळाने आक्षेपार्ह बातमी छापली आणि हे पाहून जान्हवीचा भाऊ अर्जुन कपूर पेटून उठला. इतका की, त्याने सोशल मीडियावर जाहीरपणे शिव्या देत आपला संताप व्यक्त केला. आता हा सगळा मामला काय, हे तुम्हाला कळायला हवेच. तर हा किस्सा आहे कालपरवाचा.  काल-परवा जान्हवी व खुशी पापा बोनी कपूर यांच्यासोबत अर्जुनच्या घरी डिनरसाठी पोहोचले. यावेळी जान्हवीने व्हाईट कलरचा ड्रेस परिधान केला होता. जान्हवी गाडीतून बाहेर निघाली आणि मीडियाचे कॅमेरे तिच्यावर रोखले गेलेत. यावेळी जान्हवीने परिधान केलेल्या ड्रेसचा बॅक नेक बराच लो होता. एका वेबसाईटने यावरूनचं बातमी तयार केली.



ही बातमी पाहून अर्जुनचे पित्त खवळले आणि त्याने ट्विटरवर संबंधित संकेतस्थळाचा चांगलाच क्लास घेतला. तुमची नजर अशा गोष्टी शोधत असेल तर तुम्हाला लाज वाटायला हवी. देशात मुलींकडे कशा नजरेतून पाहिले जाते, याचे हे उदाहरण आहे, असे ट्विट त्याने केले.



ALSO READ : सावत्र बहिणीला सोबत घेऊन मनीष मल्होत्राला भेटायला पोहोचली जान्हवी कपूर!

अर्जुन सध्या त्याच्या आगामी ‘नमस्ते इंग्लंड’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.   श्रीदेवी यांच्या निधनाची बातमी मिळताच तो शूटिंग सोडून लगेच  मुंबईत पोहोचला होता. वास्तविक अर्जुनने नेहमीच जान्हवी आणि खुशीपासून दूर राहणे पसंत केले. तो कधीच त्यांच्या जवळ गेला नाही. परंतु श्रीदेवी यांच्या निधनामुळे सर्व रूसवे दूर करीत त्याने आपल्या दोन्ही बहिणींना सावरले. मध्यंतरी अर्जुन व अंशुला दोघेही बोनी कपूर यांच्या घरी शिफ्ट होणार, अशी बातमी आली होती. जान्हवी व खुशीची काळजी घेता यावी, म्हणून त्याने हा निर्णय घेतल्याचे कळले होते.

Web Title: Arjun Kapoor, who has somehow happened with Jhanvi Kapoor !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.