अर्जुन कपूरला करायचे आहे या खेळाडूच्या बायोपिकमध्ये काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2017 11:38 IST2017-10-28T06:08:36+5:302017-10-28T11:38:36+5:30

अभिनेता अर्जुन कपूरचे खेळावरील प्रेम कधी लपून राहिलेले नाही. नुकताच अर्जुन आईएसएल फुटबॉलच्या पुण्याच्या टीमचा को-ओनर बनला आहे. यावेळी ...

Arjun Kapoor wants to work in this player's biopic | अर्जुन कपूरला करायचे आहे या खेळाडूच्या बायोपिकमध्ये काम

अर्जुन कपूरला करायचे आहे या खेळाडूच्या बायोपिकमध्ये काम

िनेता अर्जुन कपूरचे खेळावरील प्रेम कधी लपून राहिलेले नाही. नुकताच अर्जुन आईएसएल फुटबॉलच्या पुण्याच्या टीमचा को-ओनर बनला आहे. यावेळी अर्जुन कपूरने  फुटबॉलबाबत त्याच्या मनात असलेले प्रेम आणि त्याच्या आगामी चित्रपटाबाबत सांगितले. आतापर्यंत इंडस्ट्रीमध्ये महेंद्र सिंग धोनी, मोहम्मद अझरुद्दीन, मेरी कॉम आणि मिल्खा सिंग या खेळाडूंच्या आयुष्यावर आधारित चित्रपट तयार करण्यात आले. अर्जुनला ही खेळाडूच्या आयुष्यावर आधारित चित्रपट काम करायचे आहे. अर्जुनने भारताचा माजी कर्णधार सौरभ गांगुलीच्या बायोपिकमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.   

अर्जुन कपूर म्हणाला की मी एक अंडरडॉग स्पोर्ट पर्सनच्या बाईओपिकमध्ये काम करणे पसंत करेन. एम एस धोनी आणि सौरव गांगुली हे दोघे फार मोठे व्यक्तिमत्त्व आहे. त्यात  एम. एस.धोनीवर चित्रपट तयार झाला आहे. 

सध्या अर्जुन कपूर 'संदीप और पिंकी फरार' आणि नमस्ते कॅनडामध्ये दिसणार आहे. 'संदीप और पिंकी फरार'मध्ये आपल्याला अर्जुन कपूर आणि परिणीती चोप्राची जोडी एकत्र दिसणार आहे.  तब्बल ४ वर्षांनंतर ही जोडी पुन्हा एकदा प्रेकक्षकांच्या भेटीला येणार आहे.2013 मध्ये आलेल्या इश्कजादे चित्रपटात दोघे एकत्र दिसले होते.  याबाबत अर्जुनला विचारले असता त्याने सांगितले की, ''आम्ही दोघेही या प्रोजेक्टसाठी फार उत्सुक आहोत, इश्कजादेनंतर आम्ही एकत्र काम नाही केले फक्त एक जाहिरातीत आम्ही केली होती. तरीपण आम्ही एकमेकांच्या संपर्कात होतो आणि अजून ही आहोत. आम्ही जरी आधी एकत्र काम केले असले तरी त्याला आता फार वेळ झाला आहे त्यामुळे आता पुन्हा एकत्र काम करताना उत्सुकतेबरोबर थोडीशी भीती सुद्धा वाटते आहे.''  

परिणीती चोप्रा गोलमाल अगेनमध्ये सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलतो आहे. हा गोलमाल सीरिजचा चौथा चित्रपट आहे.  या सीरिजचा पहिल्यांदाच तब्बू आणि परिणीती चोप्रा भाग बनल्या आहेत.या चित्रपटाने रिलीज आधीचे बरेच रेकॉर्ड तोडले आहेत  रिलीजनंतर चार दिवसांतच या चित्रपटाने 100 कोटींचा गल्ला जमावला होता. .   

Web Title: Arjun Kapoor wants to work in this player's biopic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.