फक्त हिरोचं! अर्जुन कपूरच्या ‘या’ चित्रपटात नसणार हिरोईन!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 19:31 IST2018-08-23T19:29:57+5:302018-08-23T19:31:05+5:30
अर्जुन कपूर सध्या आपल्या दोन चित्रपटांच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. नुकतेच त्याने राजकुमार गुप्ता यांच्या ‘इंडियाज मोस्ट वॉन्टेड’ या चित्रपटाचे शूटींग सुरू केले. या चित्रपटाबद्दलची उत्सुकता अर्जुनने अलीकडे सोशल मीडियावर बोलून दाखवली होती.

फक्त हिरोचं! अर्जुन कपूरच्या ‘या’ चित्रपटात नसणार हिरोईन!
अर्जुन कपूर सध्या आपल्या दोन चित्रपटांच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. नुकतेच त्याने राजकुमार गुप्ता यांच्या ‘इंडियाज मोस्ट वॉन्टेड’ या चित्रपटाचे शूटींग सुरू केले. या चित्रपटाबद्दलची उत्सुकता अर्जुनने अलीकडे सोशल मीडियावर बोलून दाखवली होती. ‘इंडियाज मोस्ट वॉन्टेड’ एक युनिक चित्रपट असणार आहे, माझा ‘इशकजादे’ रिलीज झाल्यानंतर मला पहिला कॉल करणारे राजकुमार गुप्ता होते. तेव्हापासून आम्हाला एकत्र काम करायचे होते. अखेर ही संधी मिळली. ‘इंडियाज मोस्ट वॉन्टेड’ या चित्रपटात एक इंटरेस्टिंग स्टोरी आहे. मी हा चित्रपट करताना नव्हर्सही आहे आणि तितकाच उत्सुकही...’असे अर्जुनने सोशल मीडियावर म्हटले होते. याच चित्रपटाबद्दल एक इंटरेस्टिंग बातमी आहे.
होय, चर्चा खरी मानाल तर या चित्रपटात अर्जुनची कुठलीही हिरोईन नसेल. अर्जुनचं हिरो अन तोच हिरोईन, असा हा चित्रपट असणार आहे. पारंपरिक हिंदी चित्रपटांपेक्षा हा चित्रपट वेगळा असेल. सूत्रांचे मानाल तर हा चित्रपट तपास प्रक्रियेवर आधारित आहे. अर्जुन यात एका गुप्तहेराच्या भूमिकेत दिसेल. दिग्दर्शक राजकुमार गुप्ता यांना ‘इंडियाज मोस्ट वॉन्टेड’ अधिकाधिक वास्तवाच्या जवळ जाणारा हवा आहे. यात जबरदस्तीने व्यक्तिरेखा कोंबण्याचा त्यांचा काहीही इरादा नाही. उगीच अर्जुनची प्रेयसी दाखवणे, मग मध्येच त्यांचा रोमान्स वा रोमॅन्टिक गाणे दाखवणे, या सगळ्याला बगल देण्याचा निर्णय त्यामुळेचं त्यांनी घेतला आहे.
राजकुमार गुप्ता यांनी याआधी ‘नो वन किल्ड जेसिका’, ‘आमिर’, ‘रेड’ अशा कंटेन्ट बेस्ट चित्रपट साकारले आहेत. तुम्ही हे चित्रपट पाहिले असतील तर राजकुमार गुप्ता यांचा अंदाज तुम्हाला येईल. राजकुमार गुप्ता आपल्या चित्रपटात कुठल्याही पात्राला गरजेपेक्षा अधिक स्पेस देत नाहीत. चित्रपटाच्या मुख्यधारेपासून चित्रपट जराही भरकटणार नाही, हा त्यांचा प्रयत्न असतो.