आधीच विभक्त झाले होते अर्जुन व मेहर! समोर आले धक्कादायक सत्य!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2018 10:53 IST2018-05-30T05:23:11+5:302018-05-30T10:53:11+5:30

 अर्जुन रामपाल आणि मेहर जेसिया यांनी कालपरवाच विभक्त होत असल्याचे जाहीर केले आणि यासोबतचं दोघांचाही २० वर्षांचा संसार तुटला. ...

Arjun and Mehr were already separated! The shocking truth came in front of you !! | आधीच विभक्त झाले होते अर्जुन व मेहर! समोर आले धक्कादायक सत्य!!

आधीच विभक्त झाले होते अर्जुन व मेहर! समोर आले धक्कादायक सत्य!!

 
र्जुन रामपाल आणि मेहर जेसिया यांनी कालपरवाच विभक्त होत असल्याचे जाहीर केले आणि यासोबतचं दोघांचाही २० वर्षांचा संसार तुटला. अनेकांना या बातमीमुळे धक्का बसला. पण बॉलिवूडचे म्हणाल बॉलिवूडकरांसाठी अर्जुन व मेहरचा हा निर्णय फारसा धक्कादायक नव्हताच. अर्थात यामागे कारणही आहे. अर्जुन व मेहर यांनी विभक्त होत असल्याची घोषणा आत्ता केली असली तरी  तीन महिन्याआधीच ते दोघेही वेगळे राहत होते. अर्जुन व मेहर हे दोघेही वांद्रयातील एका फ्लॅटमध्ये राहत होते. पण अर्जुनने तीन महिन्यांपूर्वीच हा फ्लॅट सोडला होता. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते, ती म्हणजे अर्जुन व मेहर यांनी वेगळे होण्याचा निर्णय तीन महिन्यांपूर्वीच घेतला होता. पण त्यांनी घोषणा आत्ता केली. हा निर्णय अमलात आणण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी का लागला, याचे कारणही आत्ता कुठे समोर आले आहे. होय, यामागे कारण होते दोन्ही मुली. मायरा व महरिका या दोघींमुळे अर्जुन व मेहर यांनी तीन महिन्यांचा वेळ घेतला. 
खरे सांगायचे तर २०१४ मध्येच अर्जुन व मेहर यांच्यात बिनसले होते. याला कारण ठरली होती, हृतिक रोशनची एक्स वाईफ सुजैन खान हिच्यासोबतची अर्जुनची वाढती जवळीक़ या जवळीकीने अर्जुन व मेहर यांच्यातील संबंध असे काही बिघडले की, ते पुन्हा पूर्ववत होऊच शकले नाहीत. याचदरम्यान अर्जुनचे फिल्मी करिअरही रसातळाला लागले. निर्माता म्हणून त्याचा पहिला चित्रपट ‘डॅडी’ दणकून आपटला. यामुळे अर्जुन कर्जात बुडाल्याचे म्हटले जाते. अर्जुनने अलीकडे झारखंडच्या एका निर्माता दिग्दर्शकाचा चित्रपट साईन केला. पण हा प्रोजेक्टही रखडला.

ALSO READ : लग्नाच्या २० वर्षांनंतर दुभंगले नाते, अर्जुन रामपाल व मेहर जेसिया विभक्त!!

१९९८ मध्ये अर्जुन व मेहर यांनी लग्न केले होते. दोघांनाही महाइका व मायरा नावाच्या दोन मुली आहेत. महाइका १६ वर्षांची आहे. तर मायरा १३ वर्षांची आहे. अर्जुन व मेहर या दोघांनी कायदेशीर घटस्फोटासाठी अर्ज केला की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Web Title: Arjun and Mehr were already separated! The shocking truth came in front of you !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.