अरिजितला वाटतेय स्वत:च्या आवाजाची लाज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2016 12:57 IST2016-10-28T12:53:52+5:302016-10-28T12:57:22+5:30

वाचून आश्चर्य वाटले ना? आम्हाला पण वाटले. संपूर्ण जग अरिजित सिंगच्या आवाजाच्या प्रेमात असताना त्याला कशाला लाज वाटले? पण ...

Arijit seems to be ashamed of his own voice! | अरिजितला वाटतेय स्वत:च्या आवाजाची लाज!

अरिजितला वाटतेय स्वत:च्या आवाजाची लाज!

चून आश्चर्य वाटले ना? आम्हाला पण वाटले. संपूर्ण जग अरिजित सिंगच्या आवाजाच्या प्रेमात असताना त्याला कशाला लाज वाटले? पण हे तो स्वत:च सांगतोय. आपल्या जादुई आवाजाने सर्वांना वेड लावलेल्या या ‘छन्ना मेरेया’ गायकाला मात्र आता स्वत:च्या आवाजाची लाज वाटत आहे.

आगामी ‘वजह तुम हो’ चित्रपटात अरिजितने ‘पल पल दिले के पास’ हे क्लासिक बॉलीवूड गाणे रिप्राईज केले आहे. ‘आज फिर तुम पे’नंतर पुन्हा एका जुन्या गाण्याला तो आपल्या आवाजाने सजवणार म्हणून चाहतेदेखील खुश होते. मात्र, स्वत: अरिजितलाच या गाण्याची लाज वाटत आहे.

फेसबुकवर एका पोस्टद्वारे त्याने संगीतकार अभिजित वघानीवर आपला राग व्यक्त केला. त्याने लिहिले की, ‘लोक उगीच स्वत:ला अतिहुशार का मानतात? अभिजित तु या गाण्यात माझ्या आवाजाला एवढ्या वाईट पद्धतीने ट्यून करशील असे वाटले नहते. तुझी संगीताची समज तर कमाल आहे बुवा! ज्यापद्धतीने तू या गाण्याची वाट लावली आहे, मला तर माझ्याच आवाजाची लाज वाटत आहे. तू असे काही करणार आहे हे जर मला माहित असते तर मी हे गाणे गायलेच नसते. मूळ गाणे जे माझे सर्वात आवडीच्या गाण्यांपैकी एक आहे, त्याचा सर्रास अपमान आहे.’

नव संगीतकाराची त्याने सोशल मीडियावर अशी खरडपट्टी काढल्यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे. याआधी अरिजितने ‘तुम बिन २’मधील ‘इश्क मुबारक’ हे गाणे त्याला आवडले नाही म्हणून पुन्हा रेकॉर्ड करण्याची मागणी केली होती.

जसे त्याचे स्टारडम वाढले, तशा त्याच्या डिमांडही वाढत आहेत असे दिसतेय. परंतु अरिजित तुझ्या फेसबुक पोस्टमुळे आधीच सलमान तुझ्यावर नाराज आहे. त्यातून तरी तू धडा घ्यायला हवा होता. बिचाऱ्या त्या संगीतकाराला तू फोन  करूनही तुझा राग व्यक्त करू शकला असता. हो ना?

Web Title: Arijit seems to be ashamed of his own voice!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.