अरबाज-सनीला खुणावतेय मॉरिशस..

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2016 16:52 IST2016-11-16T16:52:23+5:302016-11-16T16:52:23+5:30

सनी लिओनी आणि मॉरिशस ऐकताच ‘वॉव’ म्हणावंसं वाटलं ना? पण यावर खरंखुरं ‘वॉव’ कुणाला म्हणावंसं वाटत असेल, तर अरबाज ...

Arbaaz-Sunny Moonlighting Mauritius .. | अरबाज-सनीला खुणावतेय मॉरिशस..

अरबाज-सनीला खुणावतेय मॉरिशस..

ी लिओनी आणि मॉरिशस ऐकताच ‘वॉव’ म्हणावंसं वाटलं ना? पण यावर खरंखुरं ‘वॉव’ कुणाला म्हणावंसं वाटत असेल, तर अरबाज खानला. होय, सनी आणि अरबाज खान हे दोघे प्रथमच राजीव वालिया यांच्या ‘तेरा इंतजार’ या म्युजिकल रोमॅन्टिक चित्रपटासाठी एकत्र आले आहेत. या चित्रपटाच्या दुसऱ्या शेड्यूलचे चित्रीकरण मॉरिशस येथे सुरू होणार आहे. 
 
आता या चित्रपटासाठी इतकी हटके जोडी  निवडण्याचे कारण काय? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. खरे तर केवळ एक रोमँटिक आणि हॉट चित्रपट साकारणे एवढाच, यामागे दिग्दर्शक राजीव वालिया यांचा उद्देश आहे. या चित्रपटाचे काही फोटो अलीकडे सोशल मीडियावर व्हायरल झालेत. या फोटोत अरबाज आणि सनी एकमेकांची कंपनी एन्जॉय करताना दिसताहेत. ‘ सनडाऊन विथ द ब्युटीफुल सनी लिओनी,’ असे कॅप्शन या फोटोंना देण्यात आलेय. या फोटोतून सनी व अरबाजचा चित्रपटातील लुकही चाहत्यांना पाहायला मिळतोय. या दोघांनी ‘कच्छ’ येथे २५ दिवस चित्रपटाची शूटिंग पूर्ण केलीय. आता पुढील शूटिंग  मॉरिशसला होणार आहे.  

अरबाज काही दिवसांपूर्वी पत्नी मलायका अरोरा खान हिच्यासोबतच्या घटस्फोटाच्या प्रकरणामुळे चर्चेत होता. आता मात्र त्याने बॉलिवूडमध्ये कमबॅक केलेय. 

Web Title: Arbaaz-Sunny Moonlighting Mauritius ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.