प्रेग्नंसीमध्ये हाय हिल्स? अरबाजची पत्नी शूराला पाहून चाहत्यांचा प्रश्न, व्हिडीओत दिसला बेबी बंप
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2025 18:08 IST2025-07-27T18:07:22+5:302025-07-27T18:08:59+5:30
काही दिवसांपूर्वीच अरबाजने शूरा गरोदर असून लवकरच बाबा होणार असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर आता शूराला स्पॉट करण्यात आलं आहे. यामध्ये तिचा बेबी बंपही दिसत आहे.

प्रेग्नंसीमध्ये हाय हिल्स? अरबाजची पत्नी शूराला पाहून चाहत्यांचा प्रश्न, व्हिडीओत दिसला बेबी बंप
बॉलिवूड अभिनेता अरबाज खान त्याच्या पर्सनल लाइफमुळे कायमच चर्चेत असते. अरबाज दुसऱ्यांदा बाबा होणार आहे. अरबाजची दुसरी पत्नी शूरा खान प्रेग्नंट आहे. काही दिवसांपूर्वीच अरबाजने शूरा गरोदर असून लवकरच बाबा होणार असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर आता शूराला स्पॉट करण्यात आलं आहे. यामध्ये तिचा बेबी बंपही दिसत आहे.
अरबाजची पत्नी शूरा खानचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये तिने काळ्या रंगाचा बॉडीकॉन ड्रेस आणि त्यावर जॅकेट घातल्याचं दिसत आहे. त्यासोबतच तिने हिल्सही घातले आहेत. यामध्ये शूराचा बेबी बंपही स्पष्ट दिसत आहे. विरल भय्यानीच्या पेजवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. चाहत्यांनी या व्हिडीओवर कमेंट चाहत्यांनी शूराला हिल्स न घालण्याचा सल्ला दिला आहे. ५७व्या वर्षी अरबाज पुन्हा बाबा होणार आहे. त्यामुळे तो आनंदी आहे.
अरबाजने १९९८ मध्ये मलायका अरोराशी लग्न केलं होतं. पण २०१७ मध्ये घटस्फोट घेत ते वेगळे झाले. त्यांना २२ वर्षांचा अरहान हा मुलगा आहे. अरबाजने २०२३मध्ये मेकअप आर्टिस्ट शूरा खानशी दुसरा निकाह केला. शूराचंही हे दुसरं लग्न आहे. आता अरबाज आणि शूरा लवकरच आईबाबा होणार आहेत.