श्रीलंकेच्या रस्त्यावर दिसला ‘ डॉ. मशहूर गुलाटी’चा ‘डुप्लिकेट’! विश्वास बसत नसेल तर एकदा पाहाचं!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2018 11:14 IST2018-03-29T05:41:31+5:302018-03-29T11:14:52+5:30
गायक, अभिनेता मेयांग चांग सध्या श्रीलंकेत मौजमस्ती करतोय. श्रीलंकेतील नव-नव्या गोष्टी शोधत, इथले नव-नवे अनुभव गाठी बांधत मेयांग भटकतोय. ...
.jpg)
श्रीलंकेच्या रस्त्यावर दिसला ‘ डॉ. मशहूर गुलाटी’चा ‘डुप्लिकेट’! विश्वास बसत नसेल तर एकदा पाहाचं!
ग यक, अभिनेता मेयांग चांग सध्या श्रीलंकेत मौजमस्ती करतोय. श्रीलंकेतील नव-नव्या गोष्टी शोधत, इथले नव-नवे अनुभव गाठी बांधत मेयांग भटकतोय. पण या भटकंतीदरम्यान मेयांगला अशी एक व्यक्ती सापडली की, तिला पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. होय, श्रीलंकेच्या एका रस्त्याच्या कडेला मेयांगला एक व्यक्ती दिसला आणि त्याला बघताच, मेयांगला ‘कॉमेडी नाईट्स विद कपिल शर्मा’मधील गाजलेले पात्र म्हणजे डॉ. मशहूर गुलाटीची आठवण झाली. होय, कारण श्रीलंकेच्या रस्त्यावर दिसलेली ती व्यक्ती हुबेहुब डॉ. मशहूर गुलाटीसारखी दिसत होती. मेयांकने त्याचा फोटो घेतला आणि सोशल मीडियावर शेअर केला. ‘जैसा की Paritosh Tripathihi ने बिलकुल सही फरमाया;Einstein नहीं, ये jobless Dr. Mashoor Gulatii हैं??Bhai,आपकी याद आ गई! ,’असे कॅप्शन त्याने लिहिले.
![]()
हा फोटो शेअर करताना मेयांगने सुनील ग्रोव्हरलाही टॅग केले. सुनील ग्रोव्हरची नजर या फोटोवर पडली आणि तोही हैरान राहिला. ‘मला विश्वास बसत नाहीये. ऐसा कौन दिखता है...’असे सुनील ग्रोव्हर यावर म्हणाला.
![]()
ALSO READ : ध्यान रखो, किडनी दोन और लीवर एक है...! सुनील ग्रोव्हरचे कपिल शर्माला असेही उत्तर!!
‘कॉमेडी नाईट्स विद कपिल शर्मा’मधील डॉ. मशहूर गुलाटी हे पात्र सुनील ग्रोव्हरने साकारले होते. त्याने साकारलेली ही भूमिका प्रचंड लोकप्रीय झाली होती. पुढे कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हरचा वाद झाला आणि ‘कॉमेडी नाईट्स विद कपिल शर्मा’मधून सुनीलने अंग काढून घेतले. पुढचा सगळा इतिहास तुम्हाला माहित आहेच. ‘कॉमेडी नाईट्स विद कपिल शर्मा’ बंद झाला. पण कदाचित या शोमधील पात्रं अजूनही लोकांच्या मनात जिवंत आहेत.
लवकरच सुनील ग्रोव्हर नवा शो घेऊन येतो आहे. ‘बिग बॉस’च्या ११ व्या सीझनची विजेती शिल्पा शिंदे या शोमध्ये त्याच्यासोबत दिसणार आहे. हा एक किक्रेट कॉमेडी डिजिटल शो असेल.