अनुष्काच्या प्रेमात परी झाली वेडी!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2016 15:09 IST2016-10-16T15:09:09+5:302016-10-16T15:09:09+5:30
दोन अभिनेत्रींमध्ये मैत्री असूच शकत नाही, असे आत्ता-आत्तापर्यंत मानले जायचे. पण बॉलिवूडची नवी पीढी मात्र यापुढे गेलीय. आजच्या नव्या ...

अनुष्काच्या प्रेमात परी झाली वेडी!!
द न अभिनेत्रींमध्ये मैत्री असूच शकत नाही, असे आत्ता-आत्तापर्यंत मानले जायचे. पण बॉलिवूडची नवी पीढी मात्र यापुढे गेलीय. आजच्या नव्या अभिनेत्रींपैकी अनेकजणी एकमेकींच्या मैत्रिणी आहे. त्याचमुळे त्या अगदी मोकळेपणाने एकमेकांची प्रशंसा करताना दिसतात. आता परिणीती चोप्राचेच बघा. सध्या परी अनुष्का शर्माच्या प्रेमात पडलीय. होय, ‘ऐ दिल है मुश्किल’च्या ट्रेलरमध्ये अनुष्काला पाहून परिणीती अक्षरश: तिच्या प्रेमात पडली. इतकी की,अनुष्कावरून तिची नजर हटेना. परिणीतीबद्दल आणखी एक गोष्ट माहिती झालीय. ती म्हणजे ती सैफ अली खानची मोठी फॅन आहे. तिचा भाऊ सहेज याने हा खुलासा केला. परी अंबाला येथील एका शाळेत होती, तेव्हा सैफ अली खानची जबरदस्त फॅन होती. सैफचा फोटो छापलेली १५०० चिप्सची पाकिटे तिने जमा केली होती. यासाठी दिवसभरात तीन चिप्सची पाकिटे ती स्वत:च फस्त करायची. केवळ सैफचा फोटो असलेलेच चिप्स घ्या, असे तिने सगळ्यांना बजावून ठेवले होते. आता या सैफसोबतच परी अनुष्काचीही फॅन झाली म्हणायची!!
![]()