​प्रभाससोबतच्या लिंकअपच्या बातम्यांवर बोलली अनुष्का शेट्टी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2017 10:21 IST2017-05-28T04:51:07+5:302017-05-28T10:21:07+5:30

‘बाहुबली’ प्रभासमुळे अनुष्का शेट्टीच्या लग्नाचा प्लान बारगळला. प्रभासने तिला दोन वर्षे लग्न करण्यापासून रोखून धरले होते, अशी बातमी वा-यासारखी ...

Anushka Shetty speaks on link-up news with Prabhas! | ​प्रभाससोबतच्या लिंकअपच्या बातम्यांवर बोलली अनुष्का शेट्टी!

​प्रभाससोबतच्या लिंकअपच्या बातम्यांवर बोलली अनुष्का शेट्टी!

ाहुबली’ प्रभासमुळे अनुष्का शेट्टीच्या लग्नाचा प्लान बारगळला. प्रभासने तिला दोन वर्षे लग्न करण्यापासून रोखून धरले होते, अशी बातमी वा-यासारखी पसरली. या पाठोपाठ अनुष्का व प्रभासच्या लिंकअपच्या बातम्याही आल्या. या सगळ्यांवर प्रभास  अद्याप काहीही बोललेला नाही. पण अनुष्का मात्र या बातम्यांमुळे फारशी आनंदी नाही, असेच दिसतेय.  होय, चर्चा खरी मानाल तर अनुष्काने या बातम्यांना सडेतोड उत्तर देण्याचे ठरवलेले दिसतेय. अनुष्का व प्रभास खूप चांगले मित्र आहेत. पण ‘बाहुबली2’ रिलीज झाल्यापासून दोघांच्या लिंकअपच्या बातम्यांना ऊत आला. दोघेही लग्न करणार, इथपर्यंत चर्चा आहे. या बातम्या कोण पसरवतयं, हेच अनुष्काला कळायला मार्ग नव्हता. पण आता अनुष्काने तिच्या व प्रभासबद्दल अशा खोट्या बातम्या पेरणाºयास शोधले आहे. ती व्यक्ती दुसरी कुणी नव्हती तर अनुष्काच्याच टीममधली एक व्यक्ती होती. त्यानेच तिच्या व प्रभासच्या लिंकअपच्या बातम्या पसरवल्या होत्या. अनुष्काला या व्यक्तीचे नाव कळताच, तिने त्याची आपल्या टीममधून हकालपट्टी केलीय.



ALSO READ : ​प्रभासमुळे अनुष्का शेट्टीचे लग्न होता होता राहिले!

याशिवाय एका मुलाखतीत प्रभास व तिच्या नात्याबद्दल ती बोलली आहे. मी कुठल्याही अभिनेत्यासोबत काम केले की, लगेच माझे नाव त्याच्यासोबत जोडले जाते. पण या बातम्यांत काहीही तथ्य नाही, असे ती म्हणाली. तूर्तास अनुष्का स्वत:चे सिंगल स्टेटस प्रचंड एन्जॉय करतेय. ‘बाहुबली2’नंतर प्रभासपाठोपाठ अनुष्का एक लोकप्रीय नाव बनले आहे. लवकरच प्रभास आणि अनुष्का ही जोडी ‘साहो’ या चित्रपटात एकत्र दिसणार असल्याचे कळतेयं. प्रभासच्या या अ‍ॅक्शनपटासाठी सर्वप्रथम कॅटरिना कैफचे नाव चर्चेत होते. मग श्रद्धा कपूर, राधिका आपटे, पूजा हेगडे अशा नावांचीही चर्चा होती. पण अखेर या चित्रपटात अनुष्काची वर्णी लागलीय. अर्थात अद्याप याबाबत अधिकृत घोषणा होणे बाकी आहे.

Web Title: Anushka Shetty speaks on link-up news with Prabhas!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.