‘साहो’मधून अनुष्का शेट्टीने सोनम कपूरचा ‘असा’ केला पत्ता कट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2017 18:03 IST2017-07-01T12:33:33+5:302017-07-01T18:03:33+5:30

अनुष्काने असा काही डावपेच आखला ज्यामुळे सोनमचा पत्ता कट करण्यात आला.

Anushka Shetty has made Sonam Kapoor's 'Such a' address cut from 'Saoho' | ‘साहो’मधून अनुष्का शेट्टीने सोनम कपूरचा ‘असा’ केला पत्ता कट!

‘साहो’मधून अनुष्का शेट्टीने सोनम कपूरचा ‘असा’ केला पत्ता कट!

ही दिवसांपूर्वीच कन्फर्म करण्यात आले की, ‘साहो’ या मोस्ट अवेटेड चित्रपटात ‘बाहुबली’ प्रभासच्या अपोझिट ‘देवसेना’ अनुष्का शेट्टी हिचे नाव निश्चित करण्यात आले आहे. परंतु अनुष्का अगोदर या भूमिकेसाठी बॉलिवूडची मोस्ट स्टायलिश अभिनेत्री सोनम कपूर हिच्या नावाचा विचार केला गेला होता. निर्मात्यांनी सोनमला पसंती देत तीच या चित्रपटात प्रभासच्या अपोझिट असेल, असे स्पष्ट केले होते. परंतु अनुष्काने असा काही डावपेच आखला ज्यामुळे सोनमचा पत्ता कट करण्यात आला. आता अनुष्काचे नाव निश्चित करण्यात आले असून, पुन्हा एकदा प्रभास आणि अनुष्का ही जोडी प्रेक्षकांना बघावयास मिळणार आहे. 

अभिनेत्री सोनम कपूर तिच्या स्टायलिश अंदाजासाठी ओळखली जाते. त्यामुळे ती प्रभाससोबत शोभून दिसेल, असे निर्मात्यांना वाटत होते. सुरुवातीला निर्माते सोनमबरोबर अ‍ॅप्रोचही झाले होते. सोनमकडूनही या चित्रपटासाठी एकप्रकारचा होकार आला होता. मात्र मधल्या काळात अचानकच अशा काही घडामोडी घडल्या ज्यामुळे सोनमचा पत्ता कट करण्यात आला. टाइम्स आॅफ इंडियाच्या वृत्तानुसार सोनमचे नाव लक्षात घेऊनच चित्रपटाच्या अन्य कास्टचा विचार केला गेला होता. प्रभाससोबत एखादी बॉलिवूड अभिनेत्री असावी, असाही विचार निर्मात्यांच्या डोक्यात होता. मात्र अचानकच सोनमचे नाव बाजूला सारले गेले. 



सध्या या चित्रपटाचे शूटिंग हैदराबाद येथे सुरू आहे. ‘बाहुबली-२’च्या रिलीजनंतर प्रभास अमेरिकेला सुट्या एन्जॉय करण्यासाठी गेला होता. तेथून परतल्यानंतर लगेचच त्याने शूटिंगला सुरुवात केली. मधल्या काळात तो मुंबई येथे करण जोहरच्या पार्टीतही सहभागी झाला होता. दरम्यान, ‘साहो’ हा तुफान अ‍ॅक्शनपट असून, यामध्ये प्रभासचा अंदाज बघण्यासारखा असेल. तब्बल १२० कोटी रुपये खर्च करून हा चित्रपट बनविला जात आहे. चित्रपटाचे टीझर ‘बाहुबली-२’च्या प्रदर्शनावेळीच रिलीज करण्यात आले होते. 

दरम्यान, ‘साहो’मध्ये प्रभासचा लुक कसा असेल यावरूनही बरीचशी चर्चा रंगली होती. क्लीन शेव लुकमध्ये प्रभास बघावयास मिळेल, असा अंदाज सुरुवातीला वर्तविण्यात आला होता. परंतु नंतर आलेल्या माहितीनुसार प्रभास ‘बाहुबली’ अंदाजातच बघावयास मिळणार आहे. त्यामुळे हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर वादळ निर्माण करेल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. चित्रपटात प्रभास अभिनेता नील नितीन मुकेश याच्याबरोबर दोन हात करताना बघावयास मिळणार आहे. 

Web Title: Anushka Shetty has made Sonam Kapoor's 'Such a' address cut from 'Saoho'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.