फोर्ब्सच्या यादीत अनुष्का शर्माचे नाव, आशियातील टॉप ३० मध्ये मिळाले स्थान!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2018 21:01 IST2018-03-27T15:31:59+5:302018-03-27T21:01:59+5:30
अभिनेत्री तथा निर्माता अनुष्का शर्माला फोर्ब्स ३० अंडर ३० आशिया २०१८च्या यादीत स्थान देण्यात आले आहे. काहीतरी वेगळे किंवा ...

फोर्ब्सच्या यादीत अनुष्का शर्माचे नाव, आशियातील टॉप ३० मध्ये मिळाले स्थान!
अ िनेत्री तथा निर्माता अनुष्का शर्माला फोर्ब्स ३० अंडर ३० आशिया २०१८च्या यादीत स्थान देण्यात आले आहे. काहीतरी वेगळे किंवा आपल्या क्षेत्रात इतरांच्या तुलनेत वेगळी कामगिरी करणाºया लोकांनाच या यादीत स्थान देण्यात आले आहे. भारतीय फिल्म उद्योगात सर्वाधिक मानधन घेणाºयांपैकी एक असलेल्या अनुष्काला या यादीत २९वे स्थान देण्यात आले आहे. अनुष्काने एक मॉडेल म्हणून २००७ मध्ये आपल्या करिअरला सुरुवात केली होती. पुढे २००८ मध्ये ‘रब ने बना दी जोडी’ या सुपरहिट चित्रपटातून आपल्या करिअरला सुरुवात केली. या चित्रपटासाठी तिला सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीचा फिल्मफेअर अवॉर्डही मिळाला होता.
याव्यतिरिक्त अनुष्काने ‘बॅण्ड बाजा बारात, जब तक है जान, पीके, बॉम्बे वेलवेट, दिल धडकने दो, ऐ दिल है मुश्किल, जब हॅरी मेट सेजल’ अशा कितीतरी चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची छाप पाडली. अभिनयाबरोबरच अनुष्काने निर्मिती क्षेत्रातही यशस्वी नशीब आजमाविले. तिने तिच्या बॅनर अंतर्गत ‘एनएच१०, फिल्लौरी आणि परी’ यासारख्या सुपरहिट चित्रपटांचीही निर्मिती केली. अनुष्काचे हे तिन्ही चित्रपट प्रेक्षकांचे मने जिंकण्यात यशस्वी ठरले आहेत.
![]()
या चित्रपटांमधील तिचा अभिनय सर्वच पातळ्यांवर सरस ठरला असून, तिने अभिनयाबरोबरच एक निर्माता म्हणूनही तिने आपली छाप सोडली आहे. दरम्यान, या यादीमध्ये अनुष्काबरोबरच भारताची बॅडमिंटन स्टार पी. व्ही. सिंधूच्या नावाचाही समावेश आहे.