IPL मध्ये विराटला सपोर्ट करताना दिसणार अनुष्का शर्मा? दीड महिन्यांच्या लेकाला घेऊन लंडनहून भारतात येणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2024 12:47 PM2024-03-22T12:47:47+5:302024-03-22T12:53:50+5:30

आयपीएलसाठी अनुष्का भारतात येणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. अकायला घेऊन अनुष्का परतणार असल्याचं बोललं जात आहे.

anushka sharma is likely to come india with son akaay to support virat kohli in IPL 2024 | IPL मध्ये विराटला सपोर्ट करताना दिसणार अनुष्का शर्मा? दीड महिन्यांच्या लेकाला घेऊन लंडनहून भारतात येणार

IPL मध्ये विराटला सपोर्ट करताना दिसणार अनुष्का शर्मा? दीड महिन्यांच्या लेकाला घेऊन लंडनहून भारतात येणार

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हे लोकप्रिय सेलिब्रिटी कपल आहेत. काही दिवसांपूर्वीच अनुष्का आणि विराट दुसऱ्यांदा आईबाबा झाले. विरुष्काला पुत्ररत्नाची प्राती झाली. लंडनमध्ये अनुष्काने मुलगा अकायला जन्म दिला. अनुष्काच्या प्रेग्नन्सींमुळे विराट अनेक सामन्यांना मुकला. पण, काहीच दिवसांपूर्वी आयपीएलसाठी तो भारतात परतला. तर अनुष्का मात्र अजूनही लंडनमध्येच आहे. पण, आयपीएलसाठी आता अनुष्का भारतात परत येणार असल्याचं बोललं जात आहे. 

बॉलविूड लाइफने दिलेल्या वृत्तानुसार, अनुष्का आयपीएलमध्ये विराटला चिअर करताना दिसू शकते. आतापर्यंत विराटने खेळलेल्या सामन्यात अनुष्का अनेकदा स्टेडियममध्ये उपस्थित राहून त्याला सपोर्ट करताना दिसून आली. त्यामुळे ती आयपीएलमध्ये हजेरी लावणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. विराट आणि अनुष्काचा मुलगा अकाय आता दीड महिन्यांचा झाला आहे. त्यामुळे त्यालादेखील विमानाने प्रवास करण्याची परवानगी मिळू शकते. 

प्रेग्नन्सीच्या चर्चांदरम्यानही गरोदर अनुष्का ते सिक्रेट ठेवून पती विराटला सपोर्ट करताना दिसली. सध्या अनुष्का अकाय आणि वामिकाबरोबर लंडनमध्ये आहे. पण, ती आयपीएलसाठी भारतात परतण्याची शक्यता असल्याची माहिती बॉलिवूड लाइफच्या सूत्रांनी दिली आहे. 

अनुष्का आणि विराटने २०१८मध्ये लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली होती. लग्नानंतर तीन वर्षांनी विरुष्का पहिल्यांदा आईबाबा झाले. २०२१मध्ये अनुष्काने वामिकाला जन्म दिला. त्यानंतर आता त्यांना पुत्ररत्नाची प्राप्ती झाली आहे. 

Web Title: anushka sharma is likely to come india with son akaay to support virat kohli in IPL 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.