रस्त्यावर प्लास्टिक फेकणा-यास अनुष्का शर्माने दिला दम! त्यानेही दिले असे खरमरीत उत्तर !!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2018 18:45 IST2018-06-17T13:15:30+5:302018-06-17T18:45:30+5:30

कालपासून अभिनेत्री अनुष्का शर्माचा एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होतोय. या व्हिडिओत अनुष्का रस्त्यावर कचरा फेकणा-या एका व्यक्तीला चांगलाच दम भरताना दिसतेय.

Anushka Sharma has thrown plastic on the road! He also gave a blank reply !! | रस्त्यावर प्लास्टिक फेकणा-यास अनुष्का शर्माने दिला दम! त्यानेही दिले असे खरमरीत उत्तर !!

रस्त्यावर प्लास्टिक फेकणा-यास अनुष्का शर्माने दिला दम! त्यानेही दिले असे खरमरीत उत्तर !!

लपासून अभिनेत्री अनुष्का शर्माचा एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होतोय. या व्हिडिओत अनुष्का रस्त्यावर कचरा फेकणा-या एका व्यक्तीला चांगलाच दम भरताना दिसतेय.  
अनुष्का पती विराट कोहलीसह आपल्या कारने दिल्लीत प्रवास करत असतानाचा हा व्हिडिओ आहे. अनुष्का व विराट कारमधून जात असताना समोरच्या गाडीतील एका व्यक्तीने रिकामी पाण्याची बाटली बाहेर फेकली. हे पाहून चिडलेल्या अनुष्काने त्या गाडीतील युवकाला भररस्त्यात सुनावलं. याचा व्हिडिओ विराटने  सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडीओत अनुष्का  कारमधील युवकाला झापताना दिसतेय.  तुम्ही रस्त्यावर कतरा का फेकतायं? तुम्ही प्लास्टिकची बाटली का फेकली? यापुढे लक्षात ठेवा, कचरा कचरापेटीत टाका, असे अनुष्का त्या तरूणाला सुनावतेय.



विराटने हा व्हिडिओ शेअर केला आणि तो लगेच व्हायरल झाला. रस्त्यावर कचरा फेकणा-यांना सुनावणारी अनुष्का, म्हणून अनेकांनी तिच्या या भूमिकेचे कौतुक केले. पण काही तासांत या प्रकरणात एक आणखी ट्विस्ट आला.




होय, ज्या व्यक्तिला अनुष्काने सुनावले होते, त्या व्हिडिओतील व्यक्तिनेही अनुष्काला तितकेच खरमरीत उत्तर दिले. अरहान सिंग नामक या व्यक्तिने अनुष्काच्या व्हिडिओचा स्क्रिनशॉट शेअर आपली भूमिका मांडली. ‘या पोस्टद्वारे मी कुठलाही फायदा उचलू इच्छित नाही. माझ्या बेजबाबदारपणामुळे जे झाले ते चुकीचेच आहे. मी निष्काळजीपणे प्लास्टिकचा एक तुकडा कारबाहेर फेकला होता. तेव्हा तिथुन जाणा-या सौंदर्यवती अनुष्का शर्माने आपल्या कारच्या खिडकीची काच खाली करून माझ्यावर एखाद्या वेड्यागत ओरडणे सुरू केले. मी माझ्या चुकीसाठी माफी मागितली. अनुष्का शर्मा कोहली, तुझी भाषा थोडी सभ्य असतील तर तुझी स्टार म्हणून असलेली उंची कमी झाली नसती. माणसात स्वच्छतेच्या जाणीवेसोबतचं थोडी सभ्यताही असायला हवी. माझ्या कारमधून मी फेकलेला प्लास्टिकचा तुकडा तुझ्या तोंडून निघालेल्या प्लास्टिकपेक्षा कमीचं होता,’असे या व्यक्तिने अनुष्काला उद्देशून लिहिले. या व्यक्तिने अनुष्काचा पती विराट यालाही टॅग केले. ‘विराट कोहलीच्या घाणेरड्या मेंदूने हा व्हिडिओ शूट करून तो का पोस्ट केला माहित नाही. प्रसिद्धीसाठी केलेला हा प्रयत्न असेल तर तो प्रत्यक्षात ती अधिक मोठी घाण आहे,’ असे त्याने लिहिले.

ALSO READ : विराट कोहलीने म्हटले, ‘अनुष्का माझी कॅप्टन’, पाहा व्हिडीओ!

Web Title: Anushka Sharma has thrown plastic on the road! He also gave a blank reply !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.