विराट कोहलीसोबत लग्न करताच अनुष्का शर्माला मिळाली गुड न्यूज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2017 15:47 IST2017-12-24T10:15:26+5:302017-12-24T15:47:45+5:30

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याच्यासोबत लग्न केल्याच्या काही दिवसांतच अभिनेत्री अनुष्का शर्मा हिच्या आयुष्यात एक मोठा आनंदाचा ...

Anushka Sharma gets married with Virat Kohli, gets good news! | विराट कोहलीसोबत लग्न करताच अनुष्का शर्माला मिळाली गुड न्यूज!

विराट कोहलीसोबत लग्न करताच अनुष्का शर्माला मिळाली गुड न्यूज!

रतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याच्यासोबत लग्न केल्याच्या काही दिवसांतच अभिनेत्री अनुष्का शर्मा हिच्या आयुष्यात एक मोठा आनंदाचा क्षण आला आहे. इटलीमध्ये लग्न, फ्रान्समध्ये हनिमून, तसेच दिल्लीतील रिसेप्शननंतर २६ डिसेंबर रोजी मायानगरी मुंबईत जलसा करणाºया अनुष्काने विराटसोबत आपल्या हॅप्पी लाइफला सुरुवात केली आहे. आता अनुष्काच्या या आनंदात आणखी भर टाकणारी बातमी समोर येत आहे. होय, फोर्ब्सने नुकतीच ‘फोर्ब्स इंडिया सेलिब्रिटी १००’ची यादी जाहीर केली असून, त्यामध्ये अनुष्काला दुसरे स्थान देण्यात आले आहे. मात्र यापेक्षाही अनुष्कासाठी मोठी गुड न्यूज म्हणजे तिच्या क्लोदिंग ब्रॅण्ड ‘नुश’लाही फोर्ब्सने स्थान दिले आहे. ही बाब अनुष्काला कळताच तिने लगेचच ही गुड न्यूज तिच्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. 



येत्या २६ डिसेंबर रोजी मुंबई येथे विरुष्काच्या लग्नाचे दुसरे रिसेप्शन पार पडणार आहे. गेल्या २१ डिसेंबरला या दाम्पत्याने नवी दिल्ली येथील हॉटेल ताजमध्ये लग्नाचे ग्रॅण्ड रिसेप्शन दिले होते. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थिती लावली होती. आता २६ तारखेला होणाºया रिसेप्शन पार्टीत बॉलिवूडमधील अनेक दिग्गज सेलिब्रिटी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. 



दरम्यान, या रिसेप्शन पार्टीनंतर विराट कोहली याच्या सुट्याही संपणार आहेत. कारण त्याला लगेचच दक्षिण आफ्रिकेच्या दौºयावर जावे लागणार आहे. याठिकाणी दोन्ही संघांमध्ये तीन कसोटी, सहा एकदिवसीय आणि तीन टी-२० सामने खेळले जातील. या दौºयावर अनुष्कादेखील विराटसोबत जाणार आहे. मात्र जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात ती परतणार आहे. कारण ती तिच्या चित्रपटाची शूटिंग पूर्ण करणार आहे. 

Web Title: Anushka Sharma gets married with Virat Kohli, gets good news!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.