हे सर्व लगेच थांबवा...! खासगी फोटो क्लिक होताच अनुष्का शर्मा भडकली

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2021 10:37 AM2021-01-07T10:37:30+5:302021-01-07T10:39:52+5:30

होय, पापाराझींनी अनुष्काचे विराटसोबतचे काही खासगी फोटो क्लिक केलेत आणि हे पाहून अनुष्का भडकली.

anushka sharma furious at photographer for invading privacy says stop this right now | हे सर्व लगेच थांबवा...! खासगी फोटो क्लिक होताच अनुष्का शर्मा भडकली

हे सर्व लगेच थांबवा...! खासगी फोटो क्लिक होताच अनुष्का शर्मा भडकली

googlenewsNext
ठळक मुद्देविराट कोहली आणि अनुष्का शर्माची पहिली भेट एका जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान झाली होती.

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटपटू विराट कोहली लवकरच आईबाबा बनणार आहेत. पण अशात अनुष्का काहीशी नाराज आहे. ही नाराजी कुणावर तर पापाराझींवर. होय, पापाराझींनी अनुष्काचे विराटसोबतचे काही खासगी फोटो क्लिक केलेत आणि हे पाहून अनुष्का भडकली. तिने सोशल मीडियावर याबद्दलची नाराजी व्यक्त करत, पापाराझींचा चांगलाच क्लास घेतला.
अगदी कालपरवा विराट व अनुष्काचा त्यांच्या घरातील लॉबीतील फोटो व्हायरल झाले होते.  विराट व अनुष्का घराच्या लॉबीत एकमेकांसोबत क्वालिट टाईम स्पेंड करत असताना पाहून काही फोटोग्राफर्सनी त्यांचे फोटो क्लिक केले होते. हेच फोटो नंतर व्हायरल झालेत. नेमक्या याच कारणाने अनुष्काचा पारा चढला.

तिने इन्स्टास्टोरीवर एक पोस्ट शेअर करत, याबद्दल फोटोग्राफर्सला चांगलेच फैलावर घेतले. फोटोग्राफर्स आणि पब्लिकेशनला अनेकदा विनंती करूनही आमच्या खासगी आयुष्यात त्यांची दखल सुरुच आहे. हे सगळे आत्ताच्या आत्ता थांबवा, असे अनुष्काने या पोस्टमध्ये लिहिले आहे.

अनुष्का शर्मा या महिन्यात बाळाला जन्म देणार आहे. आपल्या पहिल्या अपत्याच्या जन्मावेळी हजर असावे यासाठी विराट क्रिकेट मालिका सोडून भारतात परतला आहे.

विराट कोहली आणि अनुष्का शर्माची पहिली भेट एका जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान झाली होती. त्यावेळी दोघे जाहिरातीचे शूटिंग करत होते. त्यापूर्वी विराटने कोणत्या अभिनेत्रीसोबत काम केले नव्हते. त्यामुळे तो सेटवर अनुष्का शर्मासमोर खूप नर्व्हस झाला होता. या जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान विराट आणि अनुष्कामध्ये फ्रेंडशीप झाली आणि मग ते दोघे एकमेकांना भेटू लागले. काही कालावधीपर्यंत दोघांनी एकमेकांना डेट केले आणि 2017 साली दोघांनी इटलीत लग्न केले.

 हे असले फोटो पब्लिकला का दाखवतेस? ‘त्या’ फोटोशूटनंतर अनुष्का शर्मा होतेय ट्रोल

प्रेग्नंट अनुष्का शर्माचे ‘वोग’साठी बोल्ड फोटोशूट, फोटो पाहून व्हाल ‘क्लिन बोल्ड’

Web Title: anushka sharma furious at photographer for invading privacy says stop this right now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.