अनुपम खेर बर्थ डे स्पेशल !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2017 12:47 IST2017-03-07T05:31:03+5:302017-03-15T12:47:14+5:30

त्यांना तब्बल 5 वेळा त्यांच्या दर्जेदार अभिनयासाठी फिल्म फेअरचा अॅवॉर्ड प्राप्त झाला आहे. त्यांच्या आजपर्यंत कारकिर्दीचा घेतलेला हा आढावा.  ...

Anupam Kher Birthday Special! | अनुपम खेर बर्थ डे स्पेशल !

अनुपम खेर बर्थ डे स्पेशल !

यांना तब्बल 5 वेळा त्यांच्या दर्जेदार अभिनयासाठी फिल्म फेअरचा अॅवॉर्ड प्राप्त झाला आहे. त्यांच्या आजपर्यंत कारकिर्दीचा घेतलेला हा आढावा. 

अनुपम खेर यांचा जन्म 7 मार्च 1955साली शिमलामध्ये कश्मीरी पंडितांच्या घरात झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण शिमलामध्येच झाले त्यांनतर त्यांनी दिल्लीतील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून (एनएसडी) त्यांनी बॅचलर डीग्री पूर्ण केली.  सुरुवातीपासूनच त्यांचा कल रंगभूमीकडे होता. अभिनयातील वेडापायी त्यांनी मुंबई गाठली. मात्र मुंबईत आल्यावर अभिनेयात करिअर करण्याची वाट तेवढी सोपी नव्हती त्यासाठी त्यांना बऱ्याच संघर्ष करावा लागला. 1982 साली मध्ये आलेल्या आगमन या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले  मात्र हा चित्रपट फारसा चालला नाही. यानंतर महेश भट्ट यांच्या सारांश या चित्रपटाने त्यांना खरी ओळख मिळवून दिली. सारांशमध्ये त्यांनी 65 वर्षांच्या वृद्धाची भूमिका अगदी सहजतेने साकारली ज्यावेळी त्यांचे वय फक्त 28वर्षे होते. याचित्रपटासाठी त्यांना सर्वश्रेष्ठ अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. 1986 साली सुभाष घई यांच्या आलेल्या कर्मा या चित्रपटात त्यांना खलनायकाची भूमिका साकारण्याचा संधी मिळाली आणि या संधीचे त्यांनी सोने केले. याचित्रपटात त्यांच्यासोबत दिलीप कुमार ही होते मात्र प्रेक्षकांना लक्षात राहिले ते अनुपम खेर.  त्यांना कर्मा आणि डॅडीमधील त्यांच्या अभिनयासाठी सर्वेकृष्ठ अभिनेत्याचे फिल्म फेअर अॅवॉर्ड पटकावले.  राम लखन, दिल, बेटा, डीडीएलजे,  हम आपके हैं कौन, कुछ-कुछ होता है, मोहब्बतें, 1942 ए लव्ह स्टोरी, वीर जारा, मैने गांधी को नहीं मारा हे त्यांचे सुपरहिट चित्रपट. ओम जय जगदीश या चित्रपटव्दारे त्यांनी दिग्दर्शन आणि निमिर्ती क्षेत्रात पदार्पण केले. मैंने गांधी को नही मारा या चित्रपटाची निर्मिती ही त्यांनीच केली होती. याचित्रपटातील त्यांच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक झाले.

ते  नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा इंडिया चे अध्यक्ष होते तसेच  फिल्म सेंसर बोर्डचे अध्यक्षपद सुद्धा त्यांनी भूषवले आहे. त्यांनी टीव्ही चॅनेलवरील अनेक शोचे यशस्वी सूत्रसंचालनदेखील केले.  अभिनय क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी 2004 मध्ये त्यांना पद्मश्री तर 2016मध्ये पद्मभूषण पुरस्कार देवून गौरवण्यात आले.80च्या दशकापासून सुरु झालेला त्यांना प्रवास आजही अविरत पणे चालू आहे. त्यांचे संपूर्ण कुंटुंब हे अभिनय क्षेत्राशी जोडल गेलेले आहे.  त्यांची पत्नी किरण राव एक उत्कृष्ट अभिनेत्री आणि संसद सदस्य आहेत. त्यांचा मुलगा सिकंदर खेर हाही हिंदी चित्रपटात काम करतो. 

Web Title: Anupam Kher Birthday Special!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.