​बॉलिवूडला आणखी एक धक्का! आयपीएल बेटींग प्रकरणात अरबाज खाननंतर साजिद खानचे नाव!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2018 19:51 IST2018-06-05T14:21:48+5:302018-06-05T19:51:48+5:30

 आयपीएल बेटींग प्रकरणात सलमान खानचा भाऊ अरबाज खान याचे नाव आल्यानंतर आता बॉलिवूडचे आणखी एक बडे नाव यात गुंतले ...

Another push for Bollywood! Sajid Khan's name after Arbaaz Khan in IPL betting case !! | ​बॉलिवूडला आणखी एक धक्का! आयपीएल बेटींग प्रकरणात अरबाज खाननंतर साजिद खानचे नाव!!

​बॉलिवूडला आणखी एक धक्का! आयपीएल बेटींग प्रकरणात अरबाज खाननंतर साजिद खानचे नाव!!

 
यपीएल बेटींग प्रकरणात सलमान खानचा भाऊ अरबाज खान याचे नाव आल्यानंतर आता बॉलिवूडचे आणखी एक बडे नाव यात गुंतले असल्याची शक्यता आहे. याप्रकरणी अटक करण्यात आलेला सट्टेबाज सोनू जालान याने एका मोठ्या नावाचा खुलासा केला आहे. हे नाव म्हणजे दिग्दर्शक साजिद खान. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, साजिद सात वर्षांपूर्वी क्रिकेटवर सट्टा लावायचा,असे सोनूने सांगितले आहे. सोनूने दिलेल्या या माहितीनंतर पोलिस साजिद खानला समन्स बजावण्याच्या तयारीत आहेत. अर्थात अद्याप पोलिसांनी साजिदला समन्स जारी केलेला नाही.
यापूर्वी या प्रकरणात अरबाजचे नाव आले आहे. अरबाजने तर आपल्या कृत्याची कबुलीही दिली आहे. सहा वर्षांपासून मी आयपीएलमध्ये सट्टा लावतोय, हे त्याने कबुल केले आहे.  

ALSO READ : आयपीएल बेटिंग प्रकरणात अरबाजचे नाव येताच खवळले सलीम खान! घेतली धक्कादायक भूमिका !!

ठाणे खंडणीविरोधी पथकाने काही दिवसांपूर्वी आयपीएल सामन्यांवर सुरु  असलेल्या आॅनलाइन बेटिंगचे रॅकेट उघड करताना डोंबिवलीतून तिघांना अटक केली होती. त्यानंतर या तिघांच्या चौकशीत हे रॅकेट देशातला आघाडीचा बुकी सोनू जालान उर्फ सोनू मालाड हा चालवत असल्याचे समोर आले होते. पोलिसांनी सोनूवर कारवाई करताना त्याला बेड्या ठोकल्या होत्या. पोलिसांनी सोनूची अधिक चौकशी केली असता, त्याच्याकडे अरबाजही बेटिंग करीत असल्याची माहिती समोर आली. सोनूकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे अरबाजने क्रिकेटच्या अनेक सामन्यांवर त्याच्याकडे सट्टा लावला होता. आतापर्यंत दोन कोटी ८० लाखांचा सट्टा तो हरला आहे. काही दिवस त्याने सूनला पैसे दिले ही. मात्र, काही रक्कम त्याने दिलीच नाही. राहिलेली रक्कम मागण्यासाठी सोनूने अरबाजकडे तगादा लावला होता. सोशल मीडियावर अरबाजचे सोनूसोबतचे फोटोही व्हायरल झाले होते. अरबाजच्या आधी अभिनेता विंदु दारा सिंगदेखील सोनूला पहिल्या आयपीएल सीझन दरम्यान भेटला होता. या प्रकरणातील मुख्य संशयित असलेल्या सोनूच्या संपर्कात देशातले ८० ते ९० बडे बुकी आणि अनेक सेलिब्रेटी असल्याची माहिती समोर येत आहे.

Web Title: Another push for Bollywood! Sajid Khan's name after Arbaaz Khan in IPL betting case !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.