बॉलिवूडमधला आणखीन एक अभिनेता झाला एन्गेज्ड

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2018 05:22 AM2018-01-23T05:22:40+5:302018-01-23T10:52:40+5:30

प्रतिक बब्बर सोमवारी गर्लफ्रेंड सान्या सागर सोबत साखरपुडा केला आहे. प्रतिकचा साखरपुडा लखनऊमधल्या फार्मफाऊसमध्ये दोघांनी रिंग एक्सेंज केली.  कारण ...

Another actor turned into angered Bollywood | बॉलिवूडमधला आणखीन एक अभिनेता झाला एन्गेज्ड

बॉलिवूडमधला आणखीन एक अभिनेता झाला एन्गेज्ड

googlenewsNext
रतिक बब्बर सोमवारी गर्लफ्रेंड सान्या सागर सोबत साखरपुडा केला आहे. प्रतिकचा साखरपुडा लखनऊमधल्या फार्मफाऊसमध्ये दोघांनी रिंग एक्सेंज केली.  कारण सान्या ही मूळची लखनौची आहे. कुटुंबातील सदस्य आणि अतिजवळच्या मित्रमंडळींच्या उपस्थितीत होती. 



प्रतिक आणि सान्या एकमेकांना गेल्या आठ वर्षांपासून ओळखतात.  सान्याने लंडनच्या गोल्डस्मिस युनिव्हर्सिटीमधून फिल्ममेकिंगमध्ये पोस्ट ग्रेज्युएशन केले आहे. सान्या एका राजकीय नेत्याची मुलगी आहे.  मुंबई मिररच्या रिपोर्टनुसार आतापर्यंत प्रतिकने आपलं नातं मीडियापासून लपवून ठेवले होते मात्र त्यांने आता याबाबत अधिकृत घोषणा केली आहे.

मीडियाशी बोलताना प्रतिक म्हणाला की, सान्या आणि माझ्यातल्या नात्याला एक पाऊल पुढे घेऊन जाण्यासाठी बसंत पंचमीहुन अधिक चांगला दिवस असूच शकतं नाही. ती बेस्ट पार्टनर आहे जी मला भेटली आहे. मला हे कळायला जास्त वेळ नाही लागला की तिला माझ्यासाठी बनवण्यात आले आहे आणि यासाठी देवाचा मी आभारी आहे. प्रतिक आणि सान्याच्या लग्नाची तारिख अजून  फायनल झालेली नाही. लग्नानंतर दोघे आपल्या जवळच्या मित्र-मैत्रिणींसाठी मुंबई आणि लखनऊमध्ये रिसेप्शन देणार आहेत. पुढे प्रतिक म्हणाला पुढचे एक - दोन वर्ष आम्हाला प्रेमाचा आनंद घ्यायचा आहे. सान्या सध्या मुंबईत लखनऊमध्ये येऊन जाऊन असते. आम्ही अजून पर्यंत लग्नाचा विचार केला आहे. पण मला विचारला तर मला बीच वेडिंग करायाला आवडेल.  

प्रतीकने २००८ मध्ये ‘जाने तू या जाने ना’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता. यानंतर ‘धोबी घाट’,‘दम मारो दम’, ‘एक दिवाना था’ या चित्रपटांत प्रतीक दिसला. पण या चित्रपटांना फार यश मिळू शकले नाही.  धर्मा प्रॉडक्शनच्या ‘स्टुडंट आॅफ दी ईअर2’ या चित्रपटातून प्रतीक बब्बर कम बॅक करणार असल्याची खबर आहे .या चित्रपटात लीड रोलमध्ये टायगर श्रॉफ आहे, हे तर कन्फर्म आहे. टायगरसोबत प्रतीकही या चित्रपटात असल्याचे कळतेय. अर्थात तो समांतर भूमिकेत नसून टायगरच्या मित्राची भूमिका तो साकारणार असल्याचे वृत्त आहे.

Web Title: Another actor turned into angered Bollywood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.