कपूर परिवारातील आणखी एका सदस्याची ‘या’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एंट्री!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2017 20:02 IST2017-07-30T14:32:18+5:302017-07-30T20:02:18+5:30

कपूर परिवारातील आणखी एक सदस्य बॉलिवूडमध्ये डेब्यू करीत आहे. होय, अभिनेता रणबीर कपूरचा चुलत भाऊ आदर जैन बॉलिवूडमध्ये नशीब ...

Another actor from Kapoor family gets entry into Bollywood from this film. | कपूर परिवारातील आणखी एका सदस्याची ‘या’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एंट्री!

कपूर परिवारातील आणखी एका सदस्याची ‘या’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एंट्री!

ूर परिवारातील आणखी एक सदस्य बॉलिवूडमध्ये डेब्यू करीत आहे. होय, अभिनेता रणबीर कपूरचा चुलत भाऊ आदर जैन बॉलिवूडमध्ये नशीब आजमावणार आहे. परंतु त्याच्या मते, त्याला अभिनेता नव्हे, तर दिग्दर्शक बनायचे आहे. आदरने शुक्रवारी त्याची भूमिका असलेल्या आगामी ‘कैदी बॅण्ड’ या चित्रपटासाठी आयोजित केलेल्या एका इव्हेंटमध्ये म्हटले की, ‘दिग्दर्शक बनणे हे माझे स्वप्न आहे. मी आतापर्यंत सहायक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. त्यावेळी मी सेटवर सर्व काही बघत आलो आहे. जसे की, डीओपीद्वारे (डायरेक्टर आॅफ फोटोग्राफी) कशा पद्धतीने एखादा शॉट तयार केला जातो. लायटिंग कशा पद्धतीने लावली जाते. दिग्दर्शक कशा पद्धतीने सूचना देत असतो. तसेच अभिनेता दिग्दर्शकांच्या सूचनांचे पालन करताना कसा अभिनय करतो, हे सर्व मी बघत आलो आहे. त्यामुळे मला दिग्दर्शक म्हणून स्वत:चे करिअर घडवायला आवडेल, असेही आदरने म्हटले.  

पुढे बोलताना आदरने म्हटले की, ‘मला दिग्दर्शनाचे काम करायला आवडते. त्याचबरोबर मी कथेवर काम करू इच्छितो. मात्र सध्या मी अभिनय करीत आहे. भविष्यात जेव्हा मला संधी मिळेल तेव्हा मी दिग्दर्शक म्हणून काम करण्यास सुरुवात करेल. दरम्यान, ‘कैदी बॅण्ड’ या चित्रपटातील त्याच्या भूमिकेविषयी बोलताना आदरने म्हटले की, ‘मला माहिती नव्हते की, कारागृह कसे असतात. याठिकाणी राहणे खूपच आव्हानात्मक आणि अवघड असते. चित्रपटात माझ्या भूमिकेचे नाव संजू आहे. तो खूपच भावुक मुलगा असतो. 

हबीब फैजलच्या ‘कैदी बॅण्ड’मधून अभिनयाला सुरुवात करणाºया अन्या सिंगने तिच्या भूमिकेविषयी सांगितले की, माझी भूमिका खूपच आव्हानात्मक आहे. कारण कारागृहात मला प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष करावा लागतो. ‘कैदी बॅण्ड’ हा चित्रपट २५ आॅगस्ट रोजी रिलीज होणार आहे. दरम्यान, कपूर परिवारातील आदरही आता इंडस्ट्रीमधील आल्याने त्याच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. आता आदर इंडस्ट्रीतील स्वत:चा कितपत निभाव लावू शकतो, हे आगामी काळात स्पष्ट होईलच. 

Web Title: Another actor from Kapoor family gets entry into Bollywood from this film.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.