अनुष्काला आवडतात आव्हानात्मक भूमिका साकारायला..

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2017 15:06 IST2017-08-01T09:26:07+5:302017-08-01T15:06:58+5:30

अभिनेत्री अनुष्का शर्मा तिचा आगामी चित्रपट ‘जब हॅरी मेट सेजल'मध्ये एका गुजराती तरुणीची भूमिका करते आहे. अनुष्काला अशा भूमिका ...

Ankka loves to play a challenging role. | अनुष्काला आवडतात आव्हानात्मक भूमिका साकारायला..

अनुष्काला आवडतात आव्हानात्मक भूमिका साकारायला..

िनेत्री अनुष्का शर्मा तिचा आगामी चित्रपट ‘जब हॅरी मेट सेजल'मध्ये एका गुजराती तरुणीची भूमिका करते आहे. अनुष्काला अशा भूमिका साकारायला खूप आवडतात ज्या तिच्या पर्सनालिटीच्या विरुद्ध असतात. अनुष्का म्हणाली, ''जेव्हा माझ्या व्यक्तिमत्त्वाला आव्हान देणारी भूमिका मला पडद्यावर साकारायची असते तेव्हा ती करायला आवडते. मग मी त्या भूमिकेच्या मूल्य आणि वैचारिक दृष्टीकोनाची समीक्षा करायला सुरुवात करते.'' पुढे ती म्हणाली, ''मी खूप गोष्टींना वेगळ्या नजरेतून बघायला सुरुवात करते. एक अभिनेत्री म्हणून एखादी भूमिका पडद्यावर साकारण्यास मी यशस्वी  होते तेव्हा मला आनंद होतो.'' 

आपल्या भूमिकेबद्दल बोलताना अनुष्का सांगते, ''सेजल एक उथळ स्वभावची मुलगी आहे. माझ्यात आणि सेजलमध्ये अजिबात साम्य नाही. मात्र आत्मसन्मान आणि सिद्धांतबद्दल बोलायचे झाले तर आमच्या दोघींमध्ये तो समान आहे.'' या चित्रपटात तिच्यासोबत शाहरुख खानसुद्धा झळकणार आहे. अनुष्का आणि शाहरुखच्या जोडीचा हा तिसरा चित्रपट आहे. या आधी रब ने बना दी जोडी, जब तक है जान या चित्रपटात एकत्र दिसले होते. दोन्ही चित्रपटात त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडली होती. ‘जब हॅरी मेट सेजल'नंतर दोघे आनंद एल राय यांच्या आगामी चित्रपटात दिसणार आहेत. 

ALSO READ : ‘जब हॅरी मेट सेजल’च्या नव्या गाण्यात पहा शाहरूख खान, अनुष्का शर्माची केमिस्ट्री!

‘जब हॅरी मेट सेजलचे दिग्दर्शन इम्तियाज अलीने केले आहे. या चित्रपटातील गाणी ही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. हा चित्रपट  हॅरी आणि सेजल यांच्यातील नात्यावर चित्रित करण्यात आले आहे. 4 ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.   

Web Title: Ankka loves to play a challenging role.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.