अंकिता कुणासोबत करतेयं दिवाळीचे शॉपिंग?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2016 13:24 IST2016-10-28T13:24:49+5:302016-10-28T13:24:49+5:30
सुशांत गेल्यामुळे आयुष्यात निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी अंकिता सध्या प्रयत्न करतेय आणि कदाचित तिला यात ब-यापैकी यशही आले आहे. होय, तिच्या आयुष्यातील ‘समवन स्पेशल’ व्यक्तीने तिला ब्रेकअपनंतरच्या एकटेपणातून बाहेर काढलेय.

अंकिता कुणासोबत करतेयं दिवाळीचे शॉपिंग?
स शांत सिंह राजपूत याच्यासोबत झालेल्या ब्रेकअपनंतर खरे तर अंकिता लोखंडे काहीशी एकटी पडली होती. सुशांतपासून दूर झाल्यानंतर अंकिताने इन्स्टाग्रावर शेअर केलेले अनेक फोटो पाहता ती किती एकटी पडलीय, हे दिसत होते. खरे तर सुशांतसोबत पुन्हा पॅचअप करण्यासाठी अंकिताने बरेच प्रयत्न करून पाहिले. अगदी अलीकडे सुशांतचा ‘एम.एस. धोनी: दी अनटोल्ड स्टोरी’हा चित्रपट पाहून अंकिताने त्याला फोन केला होता. अलीकडे अंकिताने करवा चौथ साजरा करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. ते पाहून तर अनेकांच्या भूवया उंचावल्या होत्या. अखेर अंकिताने हे व्रत कुणासाठी ठेवले, हाच एक प्रश्न सर्वांना पडला होता. पण या फोटोमागे महिला चाहत्यांना करवा चौथच्या शुभेच्छा देणे, इतकाच उद्देश असल्याचे स्वत: अंकितानेच स्पष्ट केले होते. सांगायचे म्हणजे, सुशांत गेल्यामुळे आयुष्यात निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी अंकिता सध्या प्रयत्न करतेय आणि कदाचित तिला यात ब-यापैकी यशही आले आहे. होय, तिच्या आयुष्यातील ‘समवन स्पेशल’ व्यक्तीने तिला ब्रेकअपनंतरच्या एकटेपणातून बाहेर काढलेय. या ‘समवन स्पेशल’सोबत अंकिता अलीकडे दिवाळीची भरगच्च शॉपिंग करताना दिसली. या ‘समवन स्पेशल’ व्यक्तिचा एक व्हिडिओ अंकितानेच तिच्या चाहत्यांशी शेअर केला आहे.
आता ही व्यक्ती कोण, हे जाणून घेण्यासाठी तुम्ही उत्सूक असाल तर ही व्यक्ति म्हणजे अंकिताचा भाऊ. होय, या व्हिडिओमधला ‘समवन स्पेशल’ म्हणजे अंकिताचा लहान भाऊ आदित्य. यापूर्वीही अंकिताने आदित्यसोबत डान्स करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. हे व्हिडिओ पाहून एक गोष्ट तर स्पष्ट आहे, ती म्हणजे कुणी सोबत असो वा नसो, अंकिताचे कुटुंब तिच्या सोबत आहे आणि म्हणूनच अंकिता आनंदी आहे.