अंकिता लोखंडेने ‘मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी'च्या शूटिंगला केली सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2017 15:31 IST2017-08-12T10:01:07+5:302017-08-12T15:31:07+5:30

छोट्या पडद्यावरील पवित्रा रिश्ता या मालिकेतून अंकिता लोखंडे हिने आपल्या करिअरची सुरुवात केली होती. अंकिताच्या फॅन्ससाठी आमच्याकडे एक खूशखबर ...

Ankita Lokhande started the shooting of 'Manikarnika - The Queen of Jhansi' | अंकिता लोखंडेने ‘मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी'च्या शूटिंगला केली सुरुवात

अंकिता लोखंडेने ‘मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी'च्या शूटिंगला केली सुरुवात

ट्या पडद्यावरील पवित्रा रिश्ता या मालिकेतून अंकिता लोखंडे हिने आपल्या करिअरची सुरुवात केली होती. अंकिताच्या फॅन्ससाठी आमच्याकडे एक खूशखबर आहे. अंकिताने आपला पहिला बॉलिवूड चित्रपट 'मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी'च्या शूटिंगला सुरुवात केली आहे. याचित्रपटात ती कंगना रणौतसोबत झळकणार आहे. यात अंकिताची ही महत्त्वाची भूमिका आहे. अंकिता यात झलकारी बाईची भूमिका साकारणार आहे. झलकारी बाईंने इंग्रजांच्या विरोधात मोर्चा उघडला होता. युद्धात राणी लक्ष्मीबाई यांच्या जागी झलकारी बाई यांना ठेवण्यात आले होते. झलकारी बाईने आपल्या शौर्याने आणि बुद्धिचातुर्याने राणी लक्ष्मीबाईंच्या निकटवतीर्यांमध्ये महत्त्वाचे स्थान प्राप्त केले होते. झलकारी बाई या राणी लक्ष्मीबाईंच्या खास व्यक्तिंपैकी एक होत्या. इतिहासात इलकारीबार्इंचे अनन्यासाधारण स्थान आहे. अंकिता तिच्या भूमिकेविषयी सांगताना म्हणाली, ''झलकारी बाईंबदल लोकांना फारशी माहिती नाही आहे. खूप काही लोकांना राणी लक्ष्मीबाई आणि झलकारी बाई यांच्या नात्याविषयीदेखील माहिती आहे.'' याचित्रपटाचे शूटिंग अंकिता हैदराबादमधल्या रामोजी फिल्म सिटीत करते आहे.



राणी लक्ष्मीबाईंची भूमिका यात कंगना रणौत साकारत आहे. तर अतुल कुलकर्णी तात्याराव टोपेंच्या भूमिकेत दिसेल. या चित्रपटातील तिन्ही कलाकारांनी घोडेस्वारीचे शिक्षण घेतले आहे. तिघांनीही आपल्या भूमिका चोख निभवण्यासाठी प्रचंड मेहनत घेतायेत. 

अकिंता लोखंडे आणि सुशांत सिंग राजपूतल हे 7 वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. त्यानंतर 2 वर्षांपूर्वी त्यांचे ब्रेकअप झाले. सुशांतने अंकिताच्या आधीचे बॉलिवूडमध्ये दमदार पदार्पण केले आहे. अंकितानंतर सुशांतचे नाव त्याची को-स्टार असलेल्या क्रिती सॅननसोबत जोडण्यात आले. मात्र क्रिती आणि सुशांत आपल्या फक्त चांगली मैत्री असल्याचे सांगतात. 

Web Title: Ankita Lokhande started the shooting of 'Manikarnika - The Queen of Jhansi'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.