​ सुशांत सिंग राजपूतसोबतच्या ब्रेकअपवर दोन वर्षांनंतर पहिल्यांदा बोलली अंकिता लोखंडे!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2018 10:39 IST2018-06-17T05:08:22+5:302018-06-17T10:39:39+5:30

अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांचे ब्रेकअप होऊन आता बराच काळ लोटला. या मधल्या काळात पुलाखालून ...

Ankita Lokhande speaks for the first time after two years on the break with Sushant Singh Rajput !! | ​ सुशांत सिंग राजपूतसोबतच्या ब्रेकअपवर दोन वर्षांनंतर पहिल्यांदा बोलली अंकिता लोखंडे!!

​ सुशांत सिंग राजपूतसोबतच्या ब्रेकअपवर दोन वर्षांनंतर पहिल्यांदा बोलली अंकिता लोखंडे!!

िनेत्री अंकिता लोखंडे आणि अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांचे ब्रेकअप होऊन आता बराच काळ लोटला. या मधल्या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. पण सुशांत वा अंकिता दोघांनीही या ब्रेकअपबद्दल एक अवाक्षरही काढले नाही. खरे तर या ब्रेकअपमुळे अंकिता तुटून पडली. काही काळ नैराश्यानेही तिला ग्रासले. पण तरिही तिने आपले मौन तोडले नाही़. आता मात्र तिने आपली चुप्पी आहे. होय, ताज्या मुलाखतीत तिने आपले मन मोकळे केलेच.



सुशांतसोबतचे नाते कधीचेच तुटले आहे, हे अंकिताने या मुलाखतीत मान्य केले. होय, ते नाते तुटले आणि त्याचा सर्वाधिक परिणाम माझ्यावर झाला. मी काम सोडले. कारण त्या काळात मला ब्रेकची गरज होती. त्या ब्रेकच्या काळात माझ्या कुटुंबाने, माझ्या मित्रांनी मला प्रचंड मदत केली. सुशांतसोबत राहताना मी स्वत:ला विसरले होते. स्वत:वर प्रेम करायला विसरले होते. स्वत:ला विसरून मी ते नाते जगत होते. पण त्या नात्याने मला खूप मोठा धडा शिकवला. मी स्वत:वर प्रेम करणे शिकले. माणसांना ओळखणे मी शिकले. कुणाला किती आणि कुठे प्राधान्य द्यावे, हे मला त्या नात्याने शिकवले. आता मी गोष्टी संतुलित करू शकते़, असे अंकिता यावेळी म्हणाली. नव्या नात्याचा शोध असल्याचेही ती म्हणाली. मी माझ्या जुन्या नात्यातून बाहेर पडले आहे आणि निश्चितपणे माझ्या प्रिन्स चार्मिंगच्या प्रतीक्षेत आहे,असे ती म्हणाली. 
अर्थात ताज्या बातम्या मानाल तर अंकिताच्या आयुष्यात तिचा प्रिन्स चार्मिंग आला आहे. होय, अंकिता बिझनेसमॅन विकी जैनला डेट करत असल्याचे कळतेय. विकी हा बॉक्स क्रिकेट लीगमधील मुंबई टीमचा सहभागीदार आहे.

ALSO READ : अंकिता लोखंडेवर का आली संजय लीला भन्साळींची माफी मागण्याची वेळ

सुशांत सिंग राजपूत आणि अंकिता लोखंडे यांचा ‘पवित्र रिश्ता’ तुटला तेव्हा, अनेकांना धक्का बसला होता. ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेच्या सेटवर सुशांत व अंकिता एकत्र आले होते. हळूहळू दोघांचे प्रेम बहरले आणि मग हे लव्हबर्ड्स जगाची पर्वा न करता एकत्र हिंडू-फिरू लागले. इतके की दोघांचे एकमेकांशिवाय पानही हलेना. सुशांत व अंकिता अनेक वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. पण अचानक काही तरी बिनसले आणि हे नाते ब्रेकअपपर्यंत पोहोचले.  सुशांत व अंकिताच्या बे्रकअपची बातमी चाहत्यांसाठीच नाही सगळ्या टीव्ही इंडस्ट्रीसाठीही धक्कादायक होती. 

Web Title: Ankita Lokhande speaks for the first time after two years on the break with Sushant Singh Rajput !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.